haris rauf on virat kohlis sixer | टी २० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ऑस्ट्रेलियात झालेल्या टी २० विश्वचषकात प्रबळ दावेदार म्हणून उदयास आली होती, पण तिचा प्रवास उपांत्य फेरीतच संपला.
टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या सामन्यात शानदार खेळ दाखवला, विशेषत: विराट कोहलीने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याने ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा केल्या. या सामन्यात विराटने हरिस रौफला दोन षटकार लगावले होते जे चांगलेच चर्चेत आले होते. आता या षटकारांवर त्याने भाष्य केलं आहे.
२३ ऑक्टोबर २०२२ रोजी मेलबर्न येथे टी २० विश्वचषकाचा गट-२ सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने ८ गड्यांच्या मोबदल्यात १५९ धावा केल्या, त्यानंतर भारताने शेवटच्या चेंडूवर हा सामना जिंकला. विराट कोहलीच्या ५३ चेंडूत ८२ धावांच्या नाबाद खेळीमुळे भारताने ६ गडी गमावून १६० धावा केल्या.
विराटची सामनावीर म्हणूनही निवड करण्यात आली. नंतर इंग्लंडने उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला, जो नंतर पाकिस्तानला पराभूत करून चॅम्पियन बनला. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या ८२ धावांच्या नाबाद खेळीत ६ चौकार आणि ४ षटकार मारले होते.
डावाच्या १९ व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर त्याने मारलेले षटकार क्वचितच कोणी विसरले असतील. या दोन चेंडूनीच संपुर्ण सामना बदलला आणि पाकिस्तानच्या हातातला सामना विराटने भारताकडे आणला. हरिस रौफने आता इतक्या दिवसानंतर यावर प्रतिक्रिया दिली आहे.
हरिस रौफ म्हणाला, विराट कोहली ज्या प्रकारे वर्ल्डकपमध्ये खेळला, तो त्याचा क्लासचा आहे. विराट कोणत्या प्रकारचे शॉट्स खेळतो हे सर्वांनाच माहीत आहे. टी-२० विश्वचषकात त्याने आमच्याविरुद्ध मारलेले षटकार, मला वाटत नाही की इतर कोणत्याही खेळाडूने तसे मारले असतील.
तसेच पुढे तो म्हणाला की, माझ्या षटकात दिनेश कार्तिक किंवा हार्दिक पांड्याने तसे षटकार मारला असते तर मला वाईट वाटले असते, पण कोहलीने ते केले आहे. कोहलीच्या बॅटमधून षटकार निघाले, तो पुर्णपणे वेगळ्या क्लासमध्ये आहे. त्यामुळे त्याने मारलेल्या षटकामुळे मला काहीच वाटले नाही.
या सामन्यातील आपल्या रणनीतीबद्दल हरिस म्हणाला, मला माहित होते की पुढचे षटक मोहम्मद नवाजचे आहे. तो फिरकीपटू आहे, त्यामुळे शेवटच्या षटकात बचावासाठी त्याच्यासाठी किमान २० धावा सोडल्या पाहिजेत, असे मनात होते. त्यामुळे मी माझ्या पद्धतीने गोलंदाजी करत होतो. त्यामुळे मी टाकलेला चेंडू योग्य होता. पण तो खुप क्लास खेळाडू असल्यामुळे त्याने त्या चेंडूलाही षटकार मारला.
महत्वाच्या बातम्या-
Akshaya Devdhar : Video: मुलगी सासरी जाणार म्हणून ढसाढसा रडले अक्षयाचे बाबा, हळदीच्या मंडपातच…
Shikhar dhavan : ‘खाली हात आया था, खाली हात जाना है’; कर्णधारपद काढून घेतल्यानंतर धवनची हताश प्रतिक्रीया
Amitabh’s Bachchan Car : पोलीस स्टेशनला धूळ खात पडलीय अमिताभची 14 कोटींची गाडी; ‘या’ कारणामुळे सोडत नाहीत गाडी