Share

‘मला परत-परत संशय येतोय की…,’ हरिहरेश्वर बोट प्रकरणी ४८ तासानंतर भाजप नेत्याचा धक्कादायक खुलासा

harihareshwar

नुकतीच रायगड येथील श्रीवर्धनमध्ये दोन संशयास्पद बोटी आढळल्या असल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या बोटीमध्ये तीन एके-४७ असल्याचे सांगितले जात आहे. तसेच एका बोटीत २२५ राउंड्स गोळ्या असल्याचेही आढळून आले आहे.

याच प्रकारावरून राजकारण देखील चांगलं तापलं होतं. याच प्रकरणावरून अनेक दावे – प्रतिदावे देखील करण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. हरिहरेश्वरमध्ये मिळालेली बोट नेमकी इथे कशी आली. त्या बोटीवर कोण होतं, याबाबत अजून स्पष्टता नाही. 

मात्र फार गंभीर बाब आहे. अजूनही सध्या याच प्रकरणाच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. असं असतानाच भाजप नेत्याने एक खळबळजनक दावा केला आहे. यामुळे आता या प्रकरणातील गुंता अधिकच वाढणार असल्याच बोललं जातं आहे. वाचा नेमकं भाजप नेत्याने काय म्हंटलं आहे?

आपल्या बेधडक व्यक्तव्याने चर्चेत असणारे भाजप भाजपचे नेते निलेश राणे यांनी हरिहरेश्वरमध्ये मिळालेल्या बोट प्रकरणावर भाष्य केलं आहे. दुसऱ्या बोटीवरील फ्रीजमध्ये जेवणाचे सामान मिळाले याचा अर्थ काहीवेळा पूर्वीच बोटीवरून ते खाऊन पिऊन गेले होते, असं निलेश राणेंनी म्हंटलं आहे. 

याबाबत पत्रकारांशी बोलताना पुढे निलेश राणे यांनी म्हंटलं आहे की, हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर दोन संशयास्पद बोटी सापडल्या, मात्र जी दुसरी बोट सापडली, त्या बोटीवरील फ्रीजमध्ये जेवणाचे सामान मिळाले ते कुजलेले नव्हते याचा अर्थ काहीवेळा पूर्वीच बोटीवरून ते खाऊन पिऊन गेले होते.

दरम्यान, ‘मला परत-परत संशय येतोय की ते गेले कुठे? कसे गेले? काही अधिकाऱ्यांना निलंबित करून कोणी हे प्रकरण हलक्यात घेऊ नये. सरकारने याची गंभीरपणे दखल घ्यावी’ अशी मागणी निलेश राणे यांनी यावेळी बोलताना केली आहे. रायफल आणि शस्त्रांनी भरलेली बोट रायगडमध्ये समुद्रकिनारी आलीच कशी? असा संतप्त सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. 

महत्त्वाच्या बातम्या
RTO : RTO अधिकाऱ्याच्या घरी सापडला खजिना, पगारापेक्षा ३ पट संपत्ती, आकडा वाचून हादराल
Ajeet Pavar: आपण एकत्र काम केलं आहे, मध्ये बोलायचं नाही; अजितदादांनी शंभूराज देसाईंची केली बोलती बंद
Twins : आईच्या डोळ्यांसमोर दोन जुळ्या मुलांनी सोडला जीव, मग प्रशासनाला आली जाग, वाचून हादराल
शिवसेनेची गळती सुरूच, नागपूरातून मोठा धक्का देत ‘हा’ बडा नेता शिंदे गटाच्या वाटेवर

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now