Hardik Pandya : आशिया कपमधील दुसरा सामना रविवारी पार पडला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात हा सामना झाला. या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. हार्दिक पांड्या या सामन्याचा हिरो ठरला. परंतु तुम्हाला माहिती आहे का पाकिस्तानच्या एका चुकीमुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. जाणून घ्या नक्की काय घडलं.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतासमोर १४८ धावांचे लक्ष ठेवले होते. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने ४३ आणि इफ्तिखार अहमदने २८ धावांची खेळी केली. तर भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने पण या सामन्यात ३ विकेट घेतल्या.
त्यानंतर १४८ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. भारताला पहिल्याच षटकात झटका बसला. केएल राहुल पहिल्याच बॉलवर शुन्यावर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर रोहित १२ धावा करून बाद झाला. त्याच्या पुढच्या षटकात विराट कोहलीही ३५ धावा काढून बाद झाला. त्यावेळी भारताच्या १० षटकात ३ बाद ६२ धावा झाल्या होत्या.
त्यानंतर रविंद्र जडेजा आणि सुर्यकुमार यादवने डाव सावरला. परंतु, नंतर सुर्यकुमार यादव बाद झाला. भारताला १८ चेंडूत ३२ धावांची गरज होती. त्याचवेळी पाकिस्तानने षटकांची गती कमी ठेवल्याने त्याचा त्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे त्यांना क्षेत्ररक्षणात बदल करावा लागला. तो म्हणजे शेवटच्या तीन षटकांत पाकला केवळ ४ खेळाडूंना ३० यार्डाच्या बाहेर ठेवावं लागलं.
त्याचाच फायदा भारताच्या हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाने उचलला. जडेजाने १८ व्या षटकात ११ धावा काढल्या. त्यानंतर १९ व्या षटकात हार्दिक पांड्याने तुफानी फलंदाजी केली. त्याने तीन चौकार मारत १४ धावा लुटल्या. नंतर शेवटच्या षटकात भारताला केवळ ७ धावांची गरज होती. हार्दिक पांड्याने षटकार मारून विजयावर शिक्कामोर्तब केलं.
दरम्यान, पाकिस्तानला षटकांची गती संथ ठेवण्याची फारच मोठी सजा मिळाली. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर भारताने या चुकीचा चांगलाच फायदा उचलला. आता भारतीय संघाचा पुढचा सामना उद्या होणार आहे. हा सामना क्रिकेटमध्ये कमजोर समजल्या जाणाऱ्या हॉंगकॉंगच्या संघाशी होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
VIDEO: शुभमन गिल सारासोबत गेला डिनर डेटला, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळेच झाले हैराण
PHOTO: २९ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण, १७ वर्षात १० चित्रपट, आता ४६ व्या वर्षी केले बोल्ड फोटोशूट
Kamal Rashid Khan: नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या केआरके आहे करोडोंचा मालक, मुंबई ते दुबई आहेत अनेक आलिशान घरे
KRK: छातीत दुखत असल्याने प्रसिद्ध अभिनेता रुग्णालयात दाखल, नुकतीच पोलिसांनी केली होती अटक