Share

‘या’ गोष्टींमध्ये धोनीच्याही पुढे निघून गेला हार्दिक पंड्या, रोहित शर्माचाही रेकॉर्ड धोक्यात

रविवारी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सने(Gujarat Titans) राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. यासह गुजरातने पहिल्याच सत्रात खेळताना ट्रॉफीवर कब्जा केला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याची ही पाचवी आयपीएल ट्रॉफी आहे.(hardik-pandya-left-dhoni-behind-rohits-record-is-also-in-danger)

हार्दिकने(Hardik Pandya) टूर्नामेंटमध्ये 487 धावा केल्या आणि 8 विकेट्स घेतल्या. गोलंदाजी, फलंदाजीसोबतच तो कर्णधारपदातही हिट ठरला. त्याने 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट घेतल्या. यानंतर हार्दिकने बॅटने आपली ताकद दाखवली. त्याने 30 चेंडूत 34 धावा केल्या. कर्णधार म्हणून हार्दिकची ही पहिलीच ट्रॉफी आहे.

याआधी त्याने मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) संघाचा भाग असताना चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबई इंडियन्स संघाचा भाग असताना त्याने 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली. हार्दिक व्यतिरिक्त किरॉन पोलार्ड आणि अंबाती रायडू यांनीही 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

मुंबईने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे आणि पोलार्ड प्रत्येक सीजनमध्ये संघाचा भाग आहे. त्याचवेळी रायुडूने 3 वेळा मुंबईच्या संघाचा आणि 2 वेळा चेन्नई सुपर किंग्जचा(Chennai Super Kings) संघाचा भाग असताना आयपीएल ट्रॉफी जिंकली. अनुभवी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 4 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने हा पराक्रम 6 वेळा केला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये आयपीएल ट्रॉफी जिंकली. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सचा भाग असताना त्याने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now