तुझ्यात जीव रंगला मालिकेतील पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिने आणि मालिकेतील राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीने साखरपूडा केला आहे. ३ मे ला त्यांचा साखरपूडा पार पडला होता. ऑनस्क्रीन नवऱ्यासोबतच तिने साखरपुडा केला आहे. (hardik joshi celebreate akshaya birthday)
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. अक्षयाने तुझ्यात जीव रंगला मालिकेत पाठकबाईचे पात्र इतके चांगले साकारले होते की तिने घराघरात एक वेगळी ओळख निर्माण केली. आज अक्षयाचा वाढदिवस आहे. आता तिच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक जोशीने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
हार्दिक जोशी इंस्टाग्रामवर खुप ऍक्टीव्ह असतो. तो वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतो आणि त्यातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतो. आता अक्षयाच्या वाढदिवासानिमित्त हार्दिकने एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
अक्षयाच्या वाढदिवासाच्या निमित्त हार्दिकने सेलिब्रेशनचे काही खास फोटो शेअर केले आहे. फोटोमध्ये त्याने डेकोरेशन केलेले आहे. त्यासोबतच तिच्यासाठी त्याने दोन केकही आणले आहे. त्यात ते दोघेही फोटोसाठी पोज देत रोमँटिक फोटो काढताना दिसत आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वात प्रिय आणि मौल्यवान व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, असे हार्दिकने म्हटले आहे. सध्या हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहे. तसेच हार्दिक जोशीच्या या फोटोवर अक्षयाने सुद्धा कमेंट केली आहे. तिने आय लव्ह यु असे म्हटले आहे.
सध्या ही पोस्ट व्हायरल होत असून अनेकांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तसेच यावेळी राणा दाचा डॉयलॉग म्हणत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिणी, चालतंय की, असे म्हणत काही चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. हार्दिकच्या या पोस्टला आतापर्यंत १ लाखाहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानात असता तर आमच्यासाठी.., उमरान मलिकबद्दल कामरान अकमलचे मोठे वक्तव्य
जाणून घ्या केतकीचा अभिनेत्री म्हणून प्रवास, ‘या’ आजाराने आहे त्रस्त; दिग्दर्शकावर केले होते ‘हे’ गंभीर आरोप
केतकी चितळे प्रकरणावर ब्राम्हण महासंघाने दिली धक्कादायक प्रतिक्रिया; म्हणाले, केतकीने जे केले ते…