हरभजन सिंह होणार AAP चा राज्यसभा उमेदवार, सांभाळू शकतो मोठी जबाबदारी

माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह यांना आम आदमी पक्षाने राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीच हरभजन सिंग यांना राज्यसभेची जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांच्याकडे क्रीडा विद्यापीठाची कमान दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.(harbhajan-singh-will-be-aaps-rajya-sabha-candidate)

खरे तर पंजाबच्या क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी त्यांनी पंजाब(Punjab) निवडणुकीच्या प्रचारात राज्यातील खेळांना प्रोत्साहन देणार असल्याचे सांगितले होते. त्या आश्वासनाची पूर्तता म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे. हरभजन सिंग यांच्याकडे स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची कमान दिल्यास पंजाबचे क्रीडा क्षेत्र वाढवण्याच्या दिशेने ते एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

पंजाबमधून राज्यसभा सदस्यांच्या निवडीसाठी 14 मार्च रोजी अधिसूचना जारी करण्यात आली होती. सर्व सदस्यांनी 21 मार्चपर्यंत अर्ज भरायचे आहेत. पक्षाकडे उमेदवार निवडण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दरम्यान, हरभजन सिंगला उमेदवार बनवण्याच्या वृत्ताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पंजाबमध्ये पाच जागांसाठी दोनदा मतदान होणार आहे. प्रथम तीन जागांसाठी आणि नंतर दोन जागांसाठी मतदान होणार आहे. उल्लेखनीय आहे की आम आदमी पक्षाने जालंधरमध्ये स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचे आश्वासन दिले असून हरभजन सिंग येथील आहे. अशा स्थितीत त्यांच्याकडे ही कमान सोपविण्याची चर्चा आहे.

आता राज्यसभेचे उमेदवार बनून हरभजन सिंह (Harbhajan Singh) निवडून आले, तर खेळानंतर त्यांची राजकारणात ग्रँड एन्ट्री होईल. हरभजन सिंग लवकरच आम आदमी पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. खुद्द पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख नवज्योतसिंग सिद्धू यांनीही हे संकेत दिले आहेत.