Share

हर घर तिरंगा अभियान वादाच्या भोवऱ्यात, कर्मचाऱ्यांच्या पगारातून कापले जाणार ‘एवढे’ रुपये

स्वातंत्र्य दिनापूर्वी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हे अभियान योजना राबविण्यात येणार असून प्रत्येक रेल्वे कर्मचारी घरोघरी राष्ट्रध्वज फडकावणार आहेत. यासाठी रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांना घरपोच तिरंगा ध्वज फडकवायला देण्यात येईल आणि त्या बदल्यात त्यांच्या पगारातून 38 रुपये प्रति ध्वज आकारण्यात येईल. पण रेल्वेचा हा आदेश युनियन नेत्यांना पसंत नसून त्यांनी याला कडाडून विरोध केला आहे.

याबाबत उत्तर मध्य रेल्वे कर्मचारी संघटनेच्या कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री चंदन सिंह म्हणाले की, रेल्वे कर्मचारी स्वत: देशभक्त आहेत आणि ते स्वतःच्या पैशाने तिरंगा खरेदी करू शकतात. हा नियम त्यांच्यावर लादू नये.

त्याचबरोबर या आदेशाबाबत झोनल जनरल सेक्रेटरी आरपी सिंग यांनीही स्टाफ बेनिफिट फंडातून ध्वज खरेदी करावा, मात्र त्यासाठी आमच्या पगारातून पैसे कापले जाऊ नयेत, असे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे कर्मचाऱ्यांना वाटण्यात येणारा तिरंगा खासगी एजन्सीद्वारे उपलब्ध करून दिला जाणार आहे.

आझादीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून, रेल्वे बोर्डाने १५ ऑगस्ट रोजी सर्व विभागीय महाव्यवस्थापक, कारखाना, आरपीएफ आणि रुग्णालय व्यवस्थापन यांना पत्र पाठवून प्रत्येकाने आपापल्या घरी तिरंगा ध्वज फडकवण्याच्या सूचना केल्या आहेत.

या तिरंग्याची खरेदी स्टाफ बेनिफिट फंडातून (कर्मचारी लाभ निधी) करायची असून नंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या खात्यातून कापलेली रक्कम कर्मचारी लाभ निधीतच पाठवायची आहे अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र कर्मचाऱ्यांचा त्याला विरोध आहे.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, रेल्वे कर्मचाऱ्यांना वाटण्यात येणाऱ्या ध्वजाची किंमत भाजप कार्यालयात 20 रुपये आहे, तर मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये 25 रुपयांना खरेदी करता येईल. बचत गट सुद्धा हा ध्वज लोकांना 20 रुपयांत देत आहेत. पण रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारातून 38 रुपये कापण्यात येणार आहेत.

अनेकांनी या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे पण अनेकांनी याला विरोधही केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, आम्ही देशभक्त आहोत आणि आम्ही स्वता तिरंगा विकत घेऊ शकतो. दरम्यान, देशभरात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जात आहे. सगळ्यांनी आपल्या घरांच्या छतावर तिरंगा फडकावला आहे.

महत्वाच्या बातम्या
ब्राम्हणांची पोरं खारीक-बदाम खातायत तर बहुजनांची पोरं.., काँग्रेस खासदाराची जीभ घसरली
..त्यामुळे राकेश झुनझुनवालांना झाले होते अनेक गंभीर आजार, स्वतःच सांगितले होते कारण
विनायक मेटेंचा घातपात की अपघात? मराठा मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक, केली चौकशीची मागणी
तिरंगा लावण्यासाठी चढले छतावर, घराची कौलं फुटल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचा पडून मृत्यु

इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now