uddhav thackeray : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याच पाहायला मिळत आहे. राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन आता 3 महिन्यांचा कार्यकाळ होऊन गेला आहे. मात्र अजूनही शिंदे – फडणवीस एकत्र आलेले नाहीये.
यामुळे दोघांमधील दरी अधिकच वाढलेली पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले, आणि तेव्हापासून या दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करत आहेत. तर दुसरीकडे राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाला प्रचंड वेग आला आहे.
40 आमदारांपाठोपाठ आता खासदार, नगरसेवक, कार्यकर्तेही शिंदे गटात सामील होताना पाहायला मिळत आहे. सध्या शिंदे यांच्या गटात सामील होण्यासाठी नेत्यांची चढाओढ सुरू आहे. अशातच आता एक वेगळी बातमी समोर येतं आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर शिंदे – ठाकरे एकत्र येणार का? ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत चाचपणी केल्याची माहिती समोर आली आहे. शुभेच्छा देतांना जुन्या मैत्रीचा संदर्भ देत असल्याचे सांगितले जात असले तरी यामागे राजकीय खेळी असल्याच देखील बोललं जात आहे.
तसं पाहायला गेलं तर, नाशिकमधील शिंदे गटात मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही नेत्याने शिंदे गटात प्रवेश केलेला नाहीये. मात्र असं असलं तरी देखील, दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देत असतांना ठाकरे गटाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची चाचपणी केल्याचे पाहायला मिळतं आहे.
सायरस मिस्त्री यांच्या शवविच्छेदन अहवालात सर्वात मोठा खुलासा, मृत्यूचे कारण आले समोर, घ्या जाणून सविस्तर
‘या’ छोट्याश्या चुकीमुळे सायरस मिस्त्रींनी गमावला जीव? अन्यथा आज ते आपल्यात असते, वाचा नेमकं काय घडलं?
पुण्यात डुप्लिकेट मुख्यमंत्र्याची हवा; मंडळांकडून मिळतायत आरतीचे आमंत्रणे, फोटो पाहून थक्क व्हा
Virat Kohali: पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर विराट-अनुष्का झाले इतके नॉटी, जीभ बाहेर काढून एकमेकांसोबत करू लागले..