Share

हॅन्डसम हंक ऋतिकची बहिण पश्मीना रोशनही आहे प्रचंड बोल्ड आणि ग्लॅमरस, पहा हॉट फोटो

रोशन कुटुंबातील आणखी एक सदस्य बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. राजेश रोशन, राकेश रोशन आणि ऋतिक रोशन यांच्यानंतर आता पश्मीना रोशन बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पश्मीना ही बाॅलीवुडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक राजेश रोशन यांची मुलगी आहे. लवकरच ती एका सिक्वेलमधुन करिअरची सुरुवात करणार आहे.

पश्मीना सध्या तिच्या ग्लॅमरस फोटोशुटमुळे चर्चेत आहे. तिचे हे फोटो पाहून ती आजच्या बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्री दीपिका पदुकोण, करीना कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि जान्हवी कपूर यांना मागे टाकणार का ? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ती ऋतिक रोशनची चुलत बहिण असून तो स्वत: तिला अभिनयाचे धडे देतोय.

राजेश रोशन यांनी ऋतिकच्या काबिल, क्रिशसह अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे.त्यांनतर आता त्यांची मुलगी बॉलीवूडमध्ये नशीब आजमावू पाहतेय. लवकरच ती ‘ इश्क विश्क रिबाउंड’ या चित्रपटातून आगमन करणार आहे. हा चित्रपट अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री ईशा रावचा ‘ इश्क विश्क ‘ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

या चित्रपटात  जिबराज खान, रोहित सराफ आणि नाईला गिरेवाला  हे मुख्य कलाकार असणार आहेत. पश्मीना जरी आतापर्यंत बॉलीवूडपासून दूर राहिली असली तरी ती सोशल मिडीयावर सक्रीय असते. सतत ती इंस्टाग्रामवर हॉट फोटो पोस्ट करत असते. नुकतेच तिने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

ऋतिकने ‘ कहो ना प्यार है’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये एन्ट्री केली होती. आता त्याची बहिण एका सिक्वेलमधून एन्ट्री करणार आहे. पश्मीनाने या पूर्वी नाटकात काम केले आहे. आता ती ऋतिककडून अभिनयाचे धडे गिरवत आहे. त्याचे आणि पश्मीनाचे नाते खूप घट्ट आहे. अलीकडेच त्याने तिच्या अभिनयाचे कौतुकही केले आहे.

नुकतच तिने या चित्रपटाबद्दल इंस्टाग्रामवर माहिती दिली आहे. ” माझी अनेक वर्षांची तपश्चर्या आणि मेहनतीचे फळ मला मिळत आहे. मी स्क्रीनवर माझा पहिला अनुभव घेऊन येत आहे. जितकी मी या चित्रपटाबद्दल  खूप उत्साही आहे, तितकीच मी घाबरली आहे”, अशा कॅप्शनसह तिने चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now