haji sayyed enter in thackeray group | गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाची आणि वंचित बहुजन आघाडीची जवळीक वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या युतीच्या चर्चाही रंगल्या आहे. असे असतानाच आता ठाकरे गटाने वंचित आघाडीला कोल्हापूरात मोठा धक्का दिला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदार संघातील नेते हाजी अस्लम सय्यद यांनी मंगळवारी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर असताना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सय्यद यांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक वंचित बहूजन आघाडीकडून लढवली होती.
२०१९ च्या निवडणूकीत हाजी सय्यद यांना १ लाख २५ हजार मते मिळाली होती. राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांचा पराभव करण्यात सय्यद यांनी महत्वाची भूमिका निभावली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकाच दगडात तीन निशाणे साधले असल्याची चर्चा आहे.
काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे ठाकरे गटाला याचा कोल्हापूरात मोठा धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच माजी आमदार राजेश क्षीरसागर एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले होते.
महत्वाचे नेते शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का होता. या बंडखोरीमुळे कोल्हापूरातील राजकीय समीकरणे सुद्धा बदलली होती. धैर्यशील माने हे शिवसेनेच्या तिकीटावरुन निवडून गेले होते. त्यामुळे आता त्यांना कट्टर प्रतीस्पर्धी म्हणून ठाकरे गटाने हाजी सय्यद यांची निवड केली आहे.
सय्यद पक्षात आल्यामुळे ठाकरे गटाला एक मजबूत दावेदार मिळाला आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणूक त्यांनी वंचित बहूजन आघाडीकडून लढली होती. पण आता उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच हाजी अस्लम सय्यद यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाची ताकद आता आणखी वाढली आहे.
महत्वाच्या बातम्या-
sanjay raut : “कर्नाटक पोलिसांनी अटक केली तरी मी घाबरलो नाही, पण साधी नोटीस येताच तुमची पँट पिवळी झाली”
‘या’ खेळाडूमुळे भारताचा स्वीकारावा लागला पराभव, बांगलादेशविरुद्ध ठरला सर्वात मोठा खलनायक
विद्यार्थिनीच्या प्रेमात पागल झालेल्या महिला शिक्षिकेने केले लिंग बदल; नंतर विद्यार्थीनीसोबत केले लग्न