भारताने काल इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या ओडीआयमध्ये जबरदस्त विजय मिळवला. या विजयाचे शिल्पकार ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या हे दोन यंग क्रिकेटर ठरले. ऋषभ पंतने तुफान फलंदाजी करत अक्षरशः इंग्लंडच्या टीमला अस्मान दाखवले. ऋषभ पंतच्या या जबरदस्त खेळामागे त्याला गुरुमंत्र देणारा युवराज सिंग होता हे आता समोर येत आहे. (Gurumantra given by this great cricketer to Rishabh Pant)
या सामन्यानंतर युवराज सिंगचे एक ट्विट सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. युवराज सिंगने त्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘४५ मिनिटं आपलं जे बोलणं झालं त्याचा फायदा झालेला दिसतोय. तू तुझ्या इनिंग्सला अशीच गती देत राहा, असंच खेळत राहा.’
पुढे तो म्हणाला की, ‘हार्दिक पांड्याचा खेळ पाहून पण आनंद झाला.’ अशाप्रकारे युवराज सिंगने ट्विट केल्यामुळे ऋषभ पंतचे सामन्यापूर्वी ४५ मिनिटं फोनवरून युवराज सिंगसोबत बोलणे झाले होते हे स्पष्ट होते. त्यामध्ये नक्की काय गुरुमंत्र ऋषभला युवराजने दिला? हे तर समजले नाही, परंतु यामागे युवराज सिंगचे मार्गदर्शन असल्याचे स्पष्ट झाले आहे.
७४/४ अशी भारताची स्थिती असताना ऋषभ पंत मैदानावर आला. त्याने ११३ बॉलमध्ये १२५ रन केले. त्यात १६ फोर आणि २ सिक्स त्याने मारले. त्याने केलेल्या जबरदस्त फलंदाजीच्या बळावर इंग्लंडने भारतासमोर ठेवलेले २६० रनांचे लक्ष भारताने सहज पार केले.
भारताने इंग्लंडमध्ये २००२ नॅटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती. त्या विजयाला २० वर्षे पूर्ण होत आहेत. यानंतर पुढच्या चारच दिवसात भारताने इंग्लंड विरुद्ध पुन्हा एक सिरीज जिंकली. इंग्लंड विरुद्ध इंग्लंडच्याच मैदानात भारताचा हा मोठा विजय आहे.
त्यावेळी २००२ च्या स्पर्धेत ३२६ रनांचे लक्ष इंग्लंडने भारतासमोर ठेवले होते. मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे ती फायनल भारताने जिंकली होती. त्याच विजयाची आठवण काल शेवटच्या सामन्यामुळे ताजी झाली.
महत्वाच्या बातम्या-
दोन गट एकाच पक्षाच्या चिन्हावर दावा करत असतील तर निर्णय कसा घेतात? काय सांगतो कायदा?
रणबीर आलियाला जुळं होणार?; स्वतः रणबीर याबाबत म्हणाला की…
दिशा पटानीचा सर्वात बोल्ड लुक व्हायरल, ब्रालेस ड्रेसला एवढा मोठा कट, पहा व्हिडीओ