Share

..त्यामुळे गुन्हेगार गुरमित राम रहिमला मिळणार झेड प्लस सुरक्षा, हरियाणा सरकारचा निर्णय

डेरा सच्चा प्रमुख गुरमित राम रहिम यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे. राम रहिम यांच्या जिवाला खलिस्ताण्यांपासून धोका असल्याचे सांगत सरकारने हे पाऊल उचलले आहे. खलिस्तान समर्थक गुरमित यांच्या जिवाला धोका पोहचवू शकतात त्यामुळे त्यांना सुरक्षा देण्याची गरज असल्याचे सरकारने सांगितले आहे.

पंजाबच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच गुरमित राम रहिम यांना २१ दिवस संचित रजेवर आहेत. त्यांच्या तब्येतीचे कारण देत रहिम यांची संचित रजा मंजुर करण्यात आली आहे. परंतुच्या रहिम यांना तुरुंगातुन बाहेर काढल्यामुळे अनेक प्रश्नांनी आपले तोंड वर काढले आहेत. यात आता रहिम यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे या प्रश्नांत आणखीन भर पाडली आहे.

याविषयी बोलताना हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी म्हटले आहे की, गुरमित राम रहिम यांना फोर्लो मंजुर करण्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही. पत्रकारांशी संवाद साधताना खट्टर यांनी हे वक्तव्य केले आहे. दुसऱ्या बाजुला पंजाबमधील अपक्ष उमेदवार परमजीत सिंग सोहाली यांनी गुरमीत राम रहीमच्या सुटकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करताना हरियाणा सरकारवर गंभीर आरोप केले होते.

त्यांनी म्हटले आहे की,  पंजाबमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी राम रहीमचा राजकीय फायदा घेण्यासाठी त्याला फर्लो देण्यात आला आहे. पंजाबमधील अनेक जागांवर राम रहीमचा खोलवर प्रभाव आहे आणि अशा स्थितीत त्याच्या सुटकेमुळे पंजाबमधील शांतता बिघडू शकते आणि हे कोणासाठीच चांगले नसेल.

यादरम्यान राम रहीमने फर्लोसाठी अर्ज केला होता. या अर्जावर रोहतक विभागाच्या आयुक्तांनी राम रहिमच्या वर्तणुकीचा पोलिसांकडून अहवाल मागवला होता. त्यानुसार चांगल्या वर्तणुकीतील कैद्यांना काही मुख्य अटींसह 21 दिवसांच्या फर्लोवर तात्पुरती सुटका देण्यात आली आहे. जर या अटी त्यांनी पाळल्या नाहीत तर त्यांची फर्लो रद्द करण्यात येईल. असे हरियाणाचे महाधिवक्ता बलदेव राज महाजन यांनी उच्च न्यायालयाला सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या
युवराज सिंगचे विराट कोहलीला भावनिक पत्र; म्हणाला, ‘तू माझ्यासाठी नेहमीच…’
तहसीलदारासाठी महिला कॉन्स्टेबलने नवऱ्याला सोडले अन् त्याने तिलाच संपवलं; वाचा नक्की काय घडलं
तुमच्याही कानात खाज येत असेल तर दुर्लश करू नका, वाचा त्यावरील उपाय आणि कारणे
मलायकाच्या फिगरसमोर सगळे झाले फेल, बिकीनीमधील हॉट फोटो पाहून तु्म्हीही घायाळ व्हाल

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now