राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर एसटी कामगारांनी अचानक धरणे आंदोलन केले. यावेळी एसटी कामगारांनी सिल्व्हर ओकच्या परिसराची तोडफोड करून आंदोलन सुरू केले. इतकेच नाही, तर निवासस्थानाला चप्पलाही फेकून मारल्या. (gunrtna sadavarte on silver oak incident)
शरद पवारांच्या निवासस्थानावर हल्ला झाल्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. तसेच याचे गंभीर परीणामही होण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाने बुधवारी २२ एप्रिलपर्यंत सर्व एसटी कामगारांच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहे, त्यामुळे कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई होऊ शकणार नाहीये.
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली होती. एसटी कामगार कामावर परतत असतानाच आज अचानक एसटी कामगारांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी आंदोलन करायला सुरुवात केली. तसेच निवासस्थानावर चप्पला फेकून मारल्या. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे की, हे आंदोलन गुणरत्न सदावर्ते यांच्या सांगण्यावरुन कामगारांनी केले आहे.
आता यावर गुणरत्न सदावर्ते यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुठं दिसतंय तिथं हल्ला केल्याचं, चप्पला सुटल्या असतील, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला होता. त्यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच १२४ महिलांचे कुंक पुसले गेले. पण तुम्हाला सांगतो केसचा निकाल लागल्यानंतर शांतता राखा, मनस्थिती शांत ठेवा असं मी आणि न्यायमुर्तींनीही सांगितलं होतं. व्यथित झालेल्या महिलांचा तुम्ही हल्ला हल्ला म्हणून बोलू नका. हल्लेखोर असते तर व्यथित आणि चक्कर आलेले कसे असतील? बांगड्या फोडणं हे गुलामगिरीतून बाहेर येण्याचं लक्षण आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
मला याची काहीही कल्पना नव्हती. प्रत्येक गोष्टीचं राजकारण करु नका. राजकारण चुलीत घातलं पाहिजे. विधवा भगिनींवर राजकारण करायचं असतं का? हा हल्ला नाही, याला हल्ल्याचं रुप दिलं जातंय. हायव्होल्टेज ड्रामा करण्यासाठी राष्ट्रवादीकडूनही हे केलं जाऊ शकतं, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
आसाराम बापूंच्या आश्रमात आढळला तरुणीचा मृतदेह; चार दिवसांपासून होती गायब
“या सगळ्यांशी माझी नाळ जुळलीय, आता मी यांच्या दारात जाऊन भोंगे वाजवायचे का?”
राजकीय नेत्यानंतर आता अतिश्रीमंत शेतकरी आयकर विभागाच्या रडारवर, ‘या’ गोष्टींची होणार चौकशी