एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दगडफेक आणि चप्पलफेक केली होती. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या प्रकरणी ११० कामगारांसह त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. (gunratna sadavrte fir file in kolhapur)
याप्रकरणी सोमवारी न्यायालयाने बुधवारपर्यंत गुणरत्न सदावर्तेंना पोलिस कोठडी सुनावली आहे. असे असतानाच आज राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हे दाखल होताना दिसून येत आहे. त्यांच्याविरोधात आंदोलनाला चिथावणी दिल्याप्रकरणी चौकशी सुरु आहे.
तसेच कर्मचाऱ्यांनी नोंदवलेल्या जबाबामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून ५५० रुपये घेतले असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणी पोलिस चौकशी करत आहे. इतकेच नाही, तर सातारा पोलिसही गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे.
दोन वर्षांपूर्वी मराठा आरक्षणाबाबत सदावर्तेंनी बेताल वक्तव्य केले होते, त्याप्रकरणी सातारा पोलिस त्यांच्यावर कारवाई करणार आहे. दोन वर्षांपूर्वी या प्रकरणी एका व्यक्तीने तक्रार दाखल केली होती. पण आज याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून सातारा पोलिस सदावर्तेंना ताब्यात घेण्यासाठी मुंबईला गेलेले आहे.
अशात आता गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात कोल्हापूरमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसा गोळा केला होता. तसाच पैसा त्यांनी मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठीही बेकायदेशीरपणे गोळा केला असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
कोल्हापूरच्या शाहूपूरी पोलिस ठाण्यात गुणरत्न सदावर्तेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदावर्ते यांनी जमा केलेला पैसा कुठे गेला याची चौकशी करावी, अशी मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. तसेच न्यायाधीश रणजित मोरे यांचा अवमान होईल अशी वक्तव्येही गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
मशिदींवरील भोंगे काढा हा सर्वोच्च न्यायालयाचाच आदेश; राज ठाकरेंनी पुरावाच दाखवला
राज ठाकरेंनी राज्य सरकारला दिली डेडलाईन; ‘या’ तारखेपर्यंत भोंगे उतरवा अन्यथा…
पांढरी साडी नेसलेल्या ऐश्वर्याने जेव्हा भर सभेत केली होती सासूची मदत, लोकं म्हणाले, बेस्ट ‘सासू-सुन’