Share

गुणरत्न सदावर्तेंंची राजकारणात एंट्री; ‘या’ निवडणूकीत उभे राहून राष्ट्रवादीला देणार ओपन चॅलेंज

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.मात्र २६ एप्रिलला ते जामिनावर बाहेर पडले. त्यानंतर आता ते पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांसाठी सक्रीय झाले आहेत.

वकील गुणरत्न सदावर्तें यांच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता ते राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एसटी विलीनीकरणाच्या संपानंतर सदावर्ते आता एसटी बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार  आहेत. याकरता सदावर्ते स्वतःचे पॅनल उभं करणार असुन त्याच्या तयारीला देखील त्यांनी सुरुवात केली आहे.

‘गरीब एसटी कर्मचाऱ्यांची श्रीमंत बँक,’ अशी एसटी बँकेची ख्याती आहे. राज्यात एसटी बँकेचे तब्बल ९० हजार मतदार आहेत. या बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित एसटी कामगार संघटनेची सत्ता आहे. याच संघटनेच्या विरोधात सदावर्ते यांनी आपले रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी
दरम्यान, एसटी कामगार संघटनेचे संदीप शिंदे यांनी  एसटी बँकेची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक प्राधिकरणाकडे केली आहे.ही मागणी करण्यामागे अनेक कारणे आहेत.एसटी संपात हजारो कामगारांवर कारवाई झाली. त्यामुळे हजारो सदस्यांना मतदान करता येणार नाही. एसटी बँक ही राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी हक्काची बँक समजली जाते.या बँकेच्या राज्यभर एकूण ५० शाखा आहेत.तर २ हजार कोटींहून अधिक ठेवी असल्याचीही शक्यता वर्तवली जाते.

पण गेल्या सहा महिन्यांपासून एसटी संपामुळे हजारो कर्मचाऱ्यांना पगारच मिळाला नाही. त्यामुळे बँकेतून कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाही कर्जाचे हप्तेच भरता आले नाहीत. त्यामुळे कर्जाचे हफ्ते न भरलेल्या अशा कर्मचाऱ्यांना बँकेच्या निवडणुकीत मतदान  करता येणार नाही.केवळ ३० हजार कर्मचारी मतदानास पात्र आहेत.त्यामुळे साहजिकच एसटी बँकेच्या मतदानावर परिणाम होऊ शकतो. याचा विचार करूनच ही मागणी केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
शेवटच्या बाॅलवर षटकार मारताच चिडला हर्षल पटेल; मैदानावरच रियान परागच्या अंगावर धावून गेला
…म्हणून इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना घडताय; संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर
‘…यामुळे बाळासाहेब ठाकरे नेहमी आनंद दिघेंवर रागवायचे’; उद्धव ठाकरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
प्रेग्नेन्सीदरम्यान प्रेग्नेंन्ट न दिसणंही गुन्हा का? ट्रोलर्सला अभिनेत्रीने दिले सडेतोड उत्तर

 

 

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now