गुणरत्न सदावर्तेंनी कुत्रा-मांजर नाही तर पाळलय चक्क गाढव; वाचा ‘मॅक्स’ची कहाणी

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर वकिल गुणरत्न सदावर्ते यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. आता सदावर्ते यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी देखील सोशल मीडियावर चर्चेत आल्याची दिसत आहे. नुकताच सोशल मीडियावर सदावर्ते यांच्या मुलीचा म्हणजेच झेनचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

या फोटोत झेन आपल्या पाळीव गाढवासोबत दिसत आहे. झेनच्या पाळीव गाढवाचे नाव मॅक्स आहे. सदावर्ते यांच्या कुटुंबातील मॅक्स त्यांच्या सर्व सुखदुःखात सहभागी असतो. मध्यंतरी न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर झेन मॅक्सला पेढा भरविताना दिसली.

झेनचा मॅक्ससोबतचा हाच फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचे कारण ठरला आहे. नेटकऱ्यांनी या फोटोला पाहून सदावर्ते कुटुंबाची टिंगल उडवली आहे. लोक मांजर, कुत्री पाळतात परंतु गाढव पाळणारे एकटे सदावर्ते असल्याचे नेटकऱ्यांनी म्हणले आहे.

मध्यंतरी झेनचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे तिच्यावर कारवाई करण्याची वेळ आली होती. समोर आलेल्या व्हिडिओत झेन १८ वर्षे पुर्ण नसताना देखील गाडी चालवताना दिसत होती. त्यामुळे तिच्यावर अनेकांनी टीका केली होती.

दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर वकिल गुणरत्न सदावर्ते अडचणीत सापडले आहे. या सर्व प्रकरणातून बाहेर पडत असतानाच मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सदावर्ते यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे.

बीडमधील भाजप तालुकाध्यक्ष स्वप्नील गलधर यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यातील पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सदावर्ते यांच्यावर हा तिसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आता आणखीन वाढ झाल्याचे दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या
विराट कोहलीचा सुपरमॅन कॅच पाहून अनुष्का शर्माने दिली ‘अशी’ रिऍक्शन, व्हिडीओ व्हायरल
खळबळजनक! मामानेच केले भाचीवर लैंगिक अत्याचार, बहिणीच्या विश्वासाचा घेतला गैरफायदा
शेन वॉटसनने रोहित शर्माची घेतली क्लास, म्हणाला, ‘या’ खेळाडूवर इतके पैसै खर्च का केले?
कपूर कुटुंबात पुन्हा वाजणार सनई-चौघडे; करिना कपूर पुन्हा करणार लग्न? व्हायरल फोटोनंतर चर्चांना उधाण