Share

गुणरत्न सदावर्तेंच्या अल्पवयीन मुलीचा जुना व्हिडिओ तुफान व्हायरल; होणार गुन्हा दाखल?

zen gunvrte

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते हे चांगलेच चर्चेत आले आहेत. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणींमद्धे वाढ होताना पाहायला मिळत आहे. साताऱ्यानंतर आता पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करणार करणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

काही दिवसांपूर्वी पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. तर आता गुणरत्न सदावर्तेंची अल्पवयीन मुलगी चांगलीच चर्चेत आली आहे. तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय..?

अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना झेन नावाची एक मुलगी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिचे वय सध्या १४-१५ वर्षांच्या आसपास आहे. असे असताना बारामतीतून आता त्यांच्या अल्पवयीन मुलीचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये ती हायवेवर कार चालविताना दिसत आहे.

तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे. दरम्यान, या व्हिडीओमध्ये गुणरत्न सदावर्ते पॅसेंजर सीटवर बसले आहेत आणि त्यांची अल्पवयीन मुलगी झेन सदावर्ते गाडी चालविताना दिसत आहे. या प्रकरणी  गुणरत्न सदावर्ते व गाडीमालक जयश्री पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, या मागणीने जोर धरला आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, गुणरत्न सदावर्तेंनी अवघ्या 12 वर्षाची असलेल्या झेनच्या हातात आपल्या फॉर्च्युनर गाडीचं स्टेअरिंग दिलं आहे. ठाणे ते दादर मार्गावर तीने गाडी चालवल्याचा आणि तिला सदावर्ते तिला प्रोत्साहन देत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतं आहे.

https://twitter.com/nitin_s_yadav/status/1515238369118228483?s=20&t=tJ_w7aMb0_iL-hYWrAcqXw

दरम्यान, बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी ट्वीट केला आहे. तसेच अल्पवयीन मुलीच्या हाती गाडी दिल्याबद्दल कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. या व्हिडीओमध्ये सदावर्ते म्हणत आहेत की, माझी मुलगी झेन ठाणे ते दादर हायवेवर पहिल्यांदाच फॉर्च्युनर ही गाडी चालवत आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पुण्यात राज ठाकरेंनी केल्या २ मोठ्या घोषणा; राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
PFI नेत्याला धमकी भोवणार? थेट राज यांना ‘छेडेंगे तो छोडेंगे नही’ म्हणणारा फरार, पोलिस अॅक्शन मोडमध्ये
राज्यात अंधभक्तांचा सुळसुळाट; राज ठाकरे यांचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी लगावला टोला
संघ रसातळाला जात असतानाही रोहित शर्मा चाहत्यांना देत होता खोटा आनंद, पहा व्हिडिओ

इतर क्राईम ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now