Share

“राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचा पंतप्रधान व्हावं अशी माझी इच्छा आहे”

udhav

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मात्र तुळजापूरच्या तुळजाभवानीचे पाय धरले आहेत. सुप्रिया ताईंनी “पुढच्या वेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे अख्खा पक्ष घेऊन तुझ्या दर्शनाला येईन” असा नवस केला आहे.

त्यानंतर राज्यात येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असे विधान सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. कॉंग्रेसने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मुंडे यांनी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल असे म्हटले असेल तर त्यात काही गैर नाही. प्रत्येक पक्षाने तशी अपेक्षा ठेवली पाहिजे. लोकशाहीत पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. मात्र काहींना दिवसाही स्वप्न पडतात, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

तर आता मुख्यमंत्री पदाबाबत शिवसेनेची प्रतिक्रिया आली आहे. उद्धव ठाकरे यांनी देशाचा पंतप्रधान व्हावं अशी इच्छा शिवसेनेच्या नेत्याने व्यक्त केली आहे. यामुळे आता मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत बिघाडी होणार असल्याची शक्यता निर्माण झाल्याच चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटलांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी याबाबत भाष्य केलं आहे. यावेळी ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशाचा पंतप्रधान व्हावं अशी आपली इच्छा असल्याचं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे. यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची काय प्रतिक्रिया येतीये? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या
मनसेचे आमदार राजू पाटील नॉट रीचेबल, एकमेव मत कोणाला मिळणार भाजप की शिवसेना?
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा त्यांच्या पठ्ठ्याने केला पूर्ण; अविनाश जाधव अयोध्येत
.’ …त्यामुळे मी सलमान खानला मुळशी पॅटर्नच्या रिमेकमध्ये घेतलं नसतं ; प्रवीण तरडे स्पष्टच बोलले
आश्रम 3 मध्ये बॉबीसोबत ऍडल्ट सीन दिल्यानंतर ईशा म्हणाली, जेव्हा तु्म्ही महान अभिनेत्यासोबत..

 

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now