सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. अशातच पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ’50 खोके एकदम OK’ या घोषणेवरुन तर मोठा गदारोळ माजला. सत्ताधारी आणि विरोधक तर थेट आमने सामने आले. 50 खोके एकदम OK या घोषणाबाजीने विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांना हैराण करुन टाकले.
यावरून आता शिंदे गट देखील आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. ’50 खोके एकदम ओक्के’ या घोषणेवरुन शिंदे गटातील आमदाराकडून संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे आता राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं असतानाच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटलांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
वाचा काय म्हणाले, गुलाबराव पाटील..?
तर अशातच काही दिवसांपासून ’50 खोके सर्व ओके अशा नवीन नवीन घोषणा निघाल्या. मात्र ज्यांना असं वाटत असेल की मंत्री झाल्यावर पोत्यांनी भरून पैसा मिळतो. त्यांनी आठ दिवस आमच्याबरोबर राहून पहा. नवव्या दिवशी तो व्यक्ती आमच्या जागेत बसला तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ असं ओपेन चॅलेंज पाटील यांनी दिलं.
दरम्यान, शिंदे गटात सामील झाल्यापासून मंत्री गुलाबराव पाटील हे चांगलेच चर्चेत आहेत. नुकतच त्यांनी केलेलं रोखठोक व्यक्तव्य हे चर्चेचा विषय बनला आहे. यावर अद्याप विरोधकांची प्रतिक्रिया आलेली नाहीये. विरोधक पाटील यांचे चॅलेंज स्वीकारणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.