gulabrao patil : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का देणारी आणखी एक बातमी समोर येतं आहे. उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे मिलिंद नार्वेकर देखील शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जातं आहे. याबद्दल खुद्द शिंदे गटातील मंत्र्यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
शिंदे गटाच्या मेळाव्यानिमित्त कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील धुळ्यात आले होते. शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पाटील यांनी ठाकरे गटावर चांगलाच पलटवार केला. यावेळी बोलताना पाटील यांनी नार्वेकर यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाबाबत वक्तव्य केलं आहे.
मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. पाटील यांच्या वक्तव्याने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आता फक्त धनुष्यबाण आमच्याकडे येऊ द्या यांच्याकडे १५ पैकी ५ आमदारही उरणार नाहीत, अस देखील ते म्हणाले.
पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे की, मेळावा ऑनलाइन नाही ऑफलाइनच झाला पाहिजे, मजा येईल, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर केली आहे. यामुळे आता ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष आणखीनच टोकाला जाणार असल्याचं बोललं जातं आहे.
दरम्यान, ‘मी सर्वांना सांगून छाताडावर भगवा झेंडा घेऊन बाहेर निघालो आहे. आम्ही ३५वर्षे रक्ताचं पाणी केलं आहे. आणि असं असून देखील आपण जर आम्हाला गद्दार म्हणत असाल तर याचे उत्तर जनता येणाऱ्या निवडणुकांमध्ये देईल,’ असं गुलाबराव पाटील स्पष्टच बोलताना म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare : आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
raj thackeray : दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी आधीच दिला होता मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे