gulabrao patil : सध्या राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. अशातच शिंदे गटातील पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पहाटेच्या शपथविधीची आठवण करून गुलाबराव पाटील यांनी अजितदादांचे कान टोचले आहेत.
काल जळगावात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर जोरदार निशाणा साधला. एकनाथ शिंदे सकाळी ६ पर्यंत काम करतात तर मग झोपतात कधी? असा प्रश्न अजितदादांनी विचारला होता.
तर आता याचाच धागा पकडून गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का?,’ असा थेट सवाल गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांपुढे उपस्थित केला.
वाचा काय म्हंटलंय गुलाबराव पाटलांनी..?
माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, ‘शिंदे – फडणवीस सरकारने जळगाव जिल्ह्यासाठी साडेतीनशे कोटी रुपये दिले. हे विरोधकांनी मान्य केलं पाहिजे, मात्र आम्हाला गद्दार म्हटले जातं आहे. विरोधकांकडून फक्त टीका करण्याचं काम केलं जातं आहे, असं पाटील म्हणाले.
पुढे बोलताना पाटील यांनी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि शिवसेनेचे गुलाबराव वाघ यांनी अप्रत्यक्षरित्या लक्ष केलं आहे. पाटील म्हणाले, ‘दोन गुलाबराव माझ्याविरोधात फिरत आहे, दोन्ही आतापासून आमदार झालेले आहेत. त्यांनी आता ठरवावं की त्यांचा खरा नवरदेव कोण? मात्र त्यांचं त्यांच्यामध्येच काही ठरत नाही.’
काय म्हणाले होते अजित पवार..?
‘एक दोन दिवस माणूस 24 तास काम करू शकेल. पण, नंतर कधीतरी तो मेंदू म्हणेल अरे झोप झोप. आम्ही ५५ वर्षे साहेबांचंही काम बघितलंय. सकाळी ते २ वाजता झोपले तरी ते सकाळी ७ वाजता तयार असायचे. पण, पाच-सहा तास झोप घ्यायचेच ना. पटेल असं बोला राव.’
Toll: बापरे! समृद्धी महामार्गावर टोल भरताना वाहनचालकांचे कंबरडे मोडणार, टोलची रक्कम ऐकून डोळे फिरतील
Shinde Group : शिंदे गटात जाताच प्रताप सरनाईकांना ईडीचा मोठा दिलासा; लवकरच केसही बंद होणार?
बायका परपुरूषांच्या संपर्कात येतील म्हणून ‘या’ पुरग्रस्त गावातील लोक घर सोडायला नाहीत तयार
amruta fadnavis : “ठाकरे सरकारमुळेच वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात येऊ शकला नाही”: अमृता फडणवीस