याचबरोबर शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा तयारीला लागले आहेत. शिवसेनेला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी रणनीती बनवत आहेत. राज्यात ठिकठिकाणी जाऊन आदित्य ठाकरे हे बंडखोरांना लक्ष करत आहेत.
आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांना गद्दार असे म्हणत आहेत. बंडखोर आमदार देखील आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देत आहेत. ‘आम्ही शिवसेनेत गेल्या ३५ वर्षांपासून काम करीत आहोत आणि ३२ वर्षांचे आदित्य ठाकरे हे आमच्यावर गद्दार असल्याचा शिक्का मारतात,’ असं पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे.
गुरुवारी माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे की, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार टीका करतात, हे योग्य आहे का ? असा सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात. मात्र, शिवसेनेच्या विचारांचे वारसदार नाहीत, अशा शब्दात पाटील यांनी लक्ष केलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे की, ‘आम्ही केलेला उठाव हा शिवसेनेच्या भल्यासाठी आहे. आमची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी नाही. मात्र, ज्यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले आहे त्यांच्यासोबत आमची नाराजी असल्याच पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केलं.
याचबरोबर ‘पक्षाचे तब्बल ८ मंत्री सोडून गेले, ४० आमदारांनी बंड केले तरीही गांभीर्य वाटले नाही, की त्यांना थांबवावे, आम्ही समजवायला गेलो तर शिवसेना नेत्या संजय राऊत म्हणाले होते की, ‘दिसतात तर सिंहासारखे मात्र हृदय उंदरासारखे’ हे राऊतांचे वाक्य लक्ष असल्याचे पाटील यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार म्हणणारे माजी खासदार शिंदे गटात सामील
Asia Cup: काय आहे जय शहा आणि तिरंगा वादाचे संपूर्ण सत्य? भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान असं काय घडलं?
PHOTO: २९ व्या वर्षी चित्रपटात पदार्पण, १७ वर्षात १० चित्रपट, आता ४६ व्या वर्षी केले बोल्ड फोटोशूट