Share

आम्ही पक्षातून लोकं फोडतो तसे इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी फोडा आणि…; गुलाबरावांचा शिक्षकांना अजब सल्ला

Gulabrao Patil
आज देशभरामध्ये शिक्षक दिन (Teachers Day) उत्साहात साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे चर्चेत आले आहेत. एका कार्यक्रमात गुलाबराव पाटील यांनी केलेलं एक वादग्रस्त वक्तव्य चर्चेचा विषय बनला आहे.

गुलाबराव पाटील यांनी आज जळगावत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना एक वादग्रस्त व्यक्तव्य केलं आहे. आज देशभरात सगळ्याच शाळांमध्ये शिक्षक दिनानिमित्त वेगेवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.  अशाच एका कार्यक्रमात पाटील (Gulabrao Patil) यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

वाचा काय म्हंटलंय?

एका कार्यक्रमादरम्यान बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हंटलं आहे की, ‘जिल्हा परिषदेच्या शाळांची दयनीय अवस्था आहे. कुंपण नाही, बसायला चांगल्या खोल्या नाहीत, बोलणाऱ्या भिंती नाहीत, शाळेचे वातावरण बदललं पाहिजे,’ अशी मागणी गुलाबराव पाटील यांनी केली.

पुढे बोलताना पाटील म्हणाले, ‘मराठी माध्यमाच्या शाळांची पटसंख्या वाढवायची असेल, तर राजकारणात ज्याप्रमाणे एखाद्या पक्षातून ज्याप्रमाणे लोक फोडतो, त्याप्रमाणे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना फोडा आणि मराठी शाळांमध्ये आणा,’ असं वादग्रस्त विधान गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

पुढे बोलताना पाटील म्हणाले की, ‘आजकाल कोण भ्रष्टाचारी नाहीये. सर्वत्र भ्रष्टाचार केला जात आहे, आता आमच्यावरही आरोप चालू आहेत. सबकुछ ओक्के…पच्चास खोके…पण, देशात भ्रष्टाचारी नसलेला माणूस असेल तर तो एकमेव शिक्षक असल्याच पाटील यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, आता गुलाबराव पाटील हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. याचाच धागा पकडत राष्ट्रवादी – कॉंग्रेस आता आक्रमक झाली आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही पाटील यांच्यावर टीका करताना म्हंटलं आहे की, ‘राजकारणातील फोडाफोडीचं राजकारण हे राजकीय लोकापर्यंत सीमित असलं पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये हे दुर्गूण येवू,’

महत्त्वाच्या बातम्या

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now