श्रावण महिना आता अगदी काही दिवसांवर आला आहे. सध्या सर्वत्र आखाड पार्ट्या सुरू आहे. अवघे काही दिवस आता शिल्लक राहिले आहेत. सध्या मांसाहार खाणाऱ्यांची चांगलीच चंगळ सुरू आहे. घरोघरी सध्या मांसाहारवर दणका सुरू आहे.
अशातच एक बातमी महत्त्वाची बातमी सध्या समोर आली आहे. श्रावण महिन्यात मांसविक्रीवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट, ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २८ ऑगस्ट या दिवशी मांसविक्री करता येणार नाही.
वाचा सविस्तर नेमका काय आहे ‘तो’ निर्णय..?
गुजरातमधील राजकोट महानगरपालिकेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. श्रावणी सोमवारच्या दिवशी मांसविक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये अंडी, मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.
२९ जुलैपासून श्रावणी सोमवार सुरु होत असल्याने महानगर पालिकेने हा निर्णय घेतला असल्याच बोललं जातं आहे. याबद्दल महापालिकेने एक पत्रक जारी केलं आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास कठोर कारवाई केली जाईल, असं देखील पत्रकात म्हंटलं आहे.
महापालिकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटल आहे की, महानगरपालिका क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करुन कोणी या कालावधीमध्ये मांसविक्री करताना दिसल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. १ ऑगस्ट, ८ ऑगस्ट, १५ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २८ ऑगस्ट या दिवशी मांसविक्री करता येणार नाही असं महापालिकेने पत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील अहमदाबाद, सूरत आणि वडोदरासारख्या महानगरपालिकाही यासंदर्भातील आदेश आगामी काही दिवसांमध्ये जारी केले जातील, असं बोललं जातं आहे. आता या आदेशाचे पालन किती होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
नुपूर शर्मांची जीभ कापणाऱ्याला एक कोटी देण्याची केली घोषणा, भीम आर्मीच्या प्रमुखाला अटक
‘या’ देशावर आलीये वाईट वेळ; उष्ट्या, शिळ्या, बुरशी लागलेल्या भाकरी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड
सुनील गावसकरांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, आधी मला सचिन तेंडूलकर आणि आता उमरान मलिक..