विरोधी पक्षातील नेत्यांवर टीका करणे असो किंवा वाढत्या पेट्रोल दरवाढीवर केंद्र सरकारला धारेवर धरणे असो, अशा कोणत्या ना कोणत्या वादामुळे राहुल गांधी सतत चर्चेत असतात. तर आता जाहीर सभेत राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल आहे.
आज गुजरातमधील अहमदाबादमध्ये कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे गेले होते. यावेळी गुजरातमध्ये राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. अनेक मुद्यांवरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला घेरले.
वाचा नेमकं राहुल गांधी यांनी काय म्हंटलंय?
पुढे बोलताना राहुल गांधी यांनी म्हंटलं आहे की, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ आणि सर्वसामान्य ग्राहकांना 300 युनिट मोफत वीज देऊ. तसेच सत्ता येताच 1000 रुपयांचा गॅस सिलिंडर 500 रुपयांना मिळणार असल्याचे देखील राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, पुढे जहरी शब्दात राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. ‘गुजरात राज्य हे नशेचं केंद्र बनले आहे. मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ नेले जातात, मात्र मोदी सरकार कारवाई करत नाही. गुजरातमध्ये आंदोलन करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते, ज्यांच्या विरोधात आंदोलन करणार त्यांची परवानगी घ्यावी का?,’ असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या
मुख्यमंत्र्याच्या सभेला जेवढी जास्त गर्दी तेवढे जास्त पैसे मिळतील; मंत्री संदीपान भुमरेंच्या मुलाचे लोकांना आवाहन
त्यांना हाफकिन पण दलाल वाटला..; तानाजी सावंताच्या अज्ञानावरून आदित्य ठाकरेंनी झाप झाप झापले
“तू ठाकरे है, तो मैं भी….”, नवनीत राणा पुन्हा उद्धव ठाकरेंवर बरसल्या, वाचा नेमकं काय म्हंटलंय?