आयपीएल २०२२ चा किताब कोण जिंकणार, याची प्रतिक्षा काल म्हणजे २९ मे रोजी संपली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल गुजरात टायटन्स आणि राजस्थान या दोन संघामध्ये सामना रंगला. कर्णधार हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे गुजरात टायटन्सने फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सवर ७ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला.
गुजरात टायटन्सने पहिल्याच सत्रात इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले. शुभमन गिलने १९ व्या ओवरच्या पहिल्याच चेंडूवर ओबेद मॅकॉयला षटकार ठोकून विजयाची औपचारिकता पूर्ण केली, तेव्हा नरेंद्र मोदी स्टेडियम एक लाखाहून अधिक प्रेक्षकांच्या टाळ्यांनी आणि आवाजाने दुमदुमले.
जगातील या सर्वात चित्तवेधक क्रिकेट लीगमध्ये नवीन संघ बनवण्याचे श्रेय कोणाला तरी जाते याबद्दल अनेकांना प्रश्न केला तर त्याचे उत्तर नक्कीच त्याचा ‘कॅप्टन कूल’ हार्दिक पांड्याला जाते असे स्पष्ट येते. राजस्थानने विजयासाठी दिलेलं १३१ धावांच लक्ष्य गुजरातने आरामात पार केलं.
पहिल्या गोलंदाजीत चार ओवरमध्ये १७ धावांत तीन विकेट घेत रॉयल्सला नऊ बाद १३० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात दोन विकेट लवकर पडल्यानंतर ३० चेंडूत ३४ धावांनी संघाला दडपणातून बाहेर काढले. टायटन्सने ११ चेंडू आणि सात विकेट्स राखून सामना जिंकला.
गिलने ४३ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४५ धावा केल्या, तर डेव्हिड मिलरने केवळ १९ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह ३२ धावा केल्या. गुजरातने ऋद्धिमान साहा (पाच) आणि मॅथ्यू वेड (आठ) यांचे विकेट लवकर गमावले होते.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने स्पर्धेचे ७ विकेटने जेतेपदाचा सामना जिंकला आणि पहिले-वहिले विजेते राजस्थान रॉयल्सच्या स्वप्न धुळीस मिळवले. या विजयासह गुजरात इंडियन प्रीमियर लीगच्या पदार्पणाच्या हंगामात जेतेपद काबीज करणारा फक्त दुसरा संघ ठरला आहे.
यापूर्वी त्यांचे प्रतिस्पर्धी राजस्थान रॉयल्सने २००८ मध्ये दिवंगत शेन वॉर्नच्या नेतृत्वात हा पराक्रम केला होता. त्यावेळी रॉयल्ससमोर एमएस धोनीचे सुपर किंग्स होते. त्यानंतर कोची टस्कर्स, पुणे सुपर जायंट्स आणि गुजरात लायन्स यांनी आयपीएलमध्ये पाऊल ठेवले, परंतु यापूर्वी पदार्पणात कोणताही संघ राजस्थानच्या कामगिरीची बरोबरी करू शकला नाही.