Share

nashik : ‘कंडक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला,अन्…,’ मालकाने सांगीतले नाशिकमधील बस कशी अन् केव्हा पेटली

nashik

nashik : आज पहाटे नाशिकमध्ये झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. आता या अपघातातील माहिती नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. या भीषण अपघातात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांची ओळख पटविण्यात अद्याप डॉक्टरांना यश आलेलं नाहीये.

आज पहाटे लक्झरी बस आणि टँकरमध्ये झालेल्या भीषण अपघाताने मोठी दुर्घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर लक्झरी बसने पेट घेतला. यात सुमारे 13 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर लक्झरी बस आणि टँकर यांच्यात भीषण अपघात झाला.

या अपघाताबद्दल खुद्द चिंतामणी ट्रॅव्हल्सचे संचालक गुड्डू जयस्वाल यांनी माहिती दिली आहे. बसच्या कंडक्टरने गुड्डू जयस्वाल यांना अपघाताची माहिती दिली. सकाळी पाच-साडे पाच वाजण्याच्या दरम्यान त्यांना कंटक्टरने फोन केला असल्याचं जयस्वाल यांनी सांगितलं.

अपघाताबद्दल जयस्वाल यांनी सांगितलं आहे की, ‘मला माझ्या आज सकाळी कंडक्टरचा कॉल आला. ‘अपघात झालाय, मोठा अपघात आहे’, इतकंच तो म्हणाला. मात्र कंडक्टरला देखील नेमकं काय झालंय, हे समजलं नव्हतं. कंटक्टर अपघातावेळी नेमका बसच्या मागच्या बाजूला गेला होता.

आणि तेवढ्यात ड्रायव्हर गाडी लेफ्ट साईडला घेत होता. अन् तेव्हा कंटक्टर मागे पॅसेंजरला उठवायला गेला. ‘चला नाशिक आलंय’, असं म्हणत तो जेव्हा मागे गेला, तितक्यात अपघात घडला. त्याच्यामुळे अपघात कसा घडला, धडक कशी बसली, हे तोही सांगू शकला नाही, असं जयस्वाल यांनी सांगितलं.

जयस्वाल यांना देखील अपघाताची पूर्ण माहिती मिळाली नाहीये. मात्र शॉर्ट सर्किट झाल्यामुळे बसने पेट घेतला असावा, असा अंदाज जयस्वाल यांनी वर्तवला आहे. मात्र हा अंदाज वर्तवला असला तरी देखील याबद्दल निश्चित सांगता येणार नसल्याचं देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now