मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा अयोध्या दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. राज यांच्या अयोध्या दौऱ्याला असलेल्या विरोध आता आणखी वाढला आहे. भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी शक्तीप्रदर्शन करत राज ठाकरेंना कुठल्याही परिस्थितीत अयोध्येत पाऊल ठेवून देणार नसल्याच स्पष्ट केलं आहे.
तर आता दुसरीकडे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी संत-महंतांची बैठक होत आहे. या बैठकीला ५० हजार लोक उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला आहे. याचबरोबर राज ठाकरेंच्या विरोधाला १० लाख लोक येतील असंही सांगितले जात आहे.
त्यामुळे आता राजकारण चांगलच तापणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या घरापासून नवाबगंज भागात रॅली काढली आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. यामुळे आता राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यानंतर राजकारण चांगलेच रंगलेलं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे राज यांनी अयोध्या दौऱ्याबाबत केलेल्या घोषणेनंतर मनसैनिक तयारीला लागले आहेत.
मात्र अशातच उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना एक गर्भित इशारा दिला. ‘राज साहेब अयोध्या दौऱ्यावर येण्याआधी हात जोडून माफी मागण्याची मागणी केली. तसेच माफी न मागितल्यास उत्तर प्रदेशात घुसून देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली.
दरम्यान, पुढे राज ठाकरेंना लक्ष करताना ब्रिजभूषण सिंह म्हणाले, ‘२००७ पासून २०२०-२१ पर्यंत राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांना शिवीगाळ केली. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. आता त्या व्यक्तीचं ह्रदयपरिवर्तन झालंय. आणि ते आज अयोध्येला येत आहेत, असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
‘तुमचे आमदार निर्दोष, अनिलबाबू लवकर बाहेर येतील,’ रोहितदादांनी दिला शब्द
‘हे फोटो कोणत्या बागेत काढलेत?’, शिवसेना नेत्यांचे फोटो ट्विट करत भाजपचा संतप्त सवाल
कशाची महागाई आली हो? सदाभाऊ खोतांनी केलं दरवाढीचं समर्थन, म्हणाले…
राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या भाजप खासदाराला महाराष्ट्रातील बड्या नेत्याचा पाठिंबा; फोन केला अन्…