Share

भर लग्नात राडा! बापाने नवरदेवाच्या कानाखाली वाजवली, नवरदेवानेही बापाला चोपले; कारण वाचून धक्का बसेल

wedding

गेल्या काही महिन्यांपासून लग्न मोडल्याचे अनेक घटना समोर आल्या आहेत. काही लग्न मोडल्याची कारणे खुपच हैराण करणारी असल्यामुळे ती लग्ने देशभरात चर्चेचा विषय ठरली होती. आता असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमधून समोर आला आहे.

लग्नाचा विधी सुरु असताना नवरदेव वारंवार नवरीमुलीच्या खोलीत जात होता. त्यामुळे त्यांचे लग्न मोडले आहे. नवरदेव वारंवार नवरीमुलीच्या खोलीत जात होता. ते मुलीच्या वडीलांनी बघितल्यामुळे त्याला रोखले. त्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि अखेर ते लग्न तुटले.

संबंधित घटना ही उत्तर प्रदेशातील शिवरामपूर गावातील आहे. याठिकाणी राहत असलेल्या एका मुलीचे लग्न कानपूरच्या मुलाशी ठरले होते. सर्व काही व्यवस्थित सुरु होतं. लग्नात नवरीमुलीला पाहिल्यानंतर नवरदेवाने आपण तिला दूर जाऊ द्यायचं नाही, असं ठरवलं होतं.

नवरदेवाला माहिती होते की लग्नानंतर नवरीला चार-पाच दिवसांसाठी माहेरी पाठवले जाते. पण ती गोष्ट त्याला मान्य नव्हती. त्यामुळे तो वारंवार मंडपातून उठून नवरीमुलीचं मन वळवण्यासाठी प्रयत्न करत होता. नवरामुलगा वारंवार मुलीच्या खोलीत जात असल्याचे तिच्या वडिलांनी बघितले, त्यामुळे ते खुप संतापले.

त्यानंतर मुलीच्या वडिलांमध्ये आणि नवरदेवामध्ये बाचाबाची झाली. अशात नवरदेवाने वडिलांच्या कानाखाली सुद्धा लगावली. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी हे लग्न मोडले आहे. नवरीमुलीचे म्हणणे आहे की, नवरदेव अनेकदा तिच्याकडे आला आणि एक वर्ष माहेरी तुला जाऊ देणार नाही, असे सांगत होता.

लग्नात वाद झाल्यामुळे पोलिस सुद्धा तिथे आले होते. त्यांनी मध्यस्थी केली पण दोन्ही पक्षांनी ऐकून घेण्यास नकार दिला. आपण खर्च केलाय त्यामुळे पैसे परत करा अशी मागणी दोन्ही पक्षांकडून केली जात होती. पण अखेर तडजोड करत हे प्रकरण मिटवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-
सगळ्यांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध मराठी बाॅलीवूड अभिनेत्रीवर कोसळला दुखाचा डोंगर; सर्वात जवळच्या व्यक्तीचे निधन
आईच्या निधनाने अभिनेत्री राखी सावंतवर कोसळला दुखाचा डोंगर; ‘या’ गंभीर आजाराने होती त्रस्त
लग्नाच्या 4 दिवसांनी लगेचच केएल राहुलने चाहत्यांना दिली गुडन्युज, पत्नी अथिया शेट्टीही झाली खूश

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now