[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यामुळे आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अनेक लोक प्रार्थना करत आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते पार्थ पवार आणि आमदार रोहित पवार यांनी शरद पवारांच्या प्रकृतीविषयी ‘आजोबा काळजी घ्या’ असं भावनिक ट्विट केलं आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती स्वतः शरद पवारांनी ट्विटरद्वारे दिली होती.
त्यात त्यांनी म्हटलं होतं की ‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी’.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1485531582261719043?t=WvdF0jWw-0nFtDKs3Ecojg&s=19
परंतु आता त्यांच्या प्रकृतीवर कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भावनिक ट्विट केलं आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की ‘आजोबा एरवी सर्वांचीच काळजी तुम्ही घेता पण आज तुमच्या कोविडच्या tweet ने सर्वांनाच काळजी वाटू लागलीय.
पण मला माहित्येय. योद्धा कधी पराभूत होत नसतो. तुम्ही लवकर बरं व्हाल! संपूर्ण महाराष्ट्राच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी आहेत.
https://twitter.com/RRPSpeaks/status/1485556797159374849?t=eiabXOnoHzbdaIGqm6zlQQ&s=19
त्याचबरोबर याआधी अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनीदेखील ट्विट करत काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं. आजोबा, काळजी घ्या, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हाल, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.
https://twitter.com/parthajitpawar/status/1485533150843650048?t=4H7c0X1shJ0Njk38dEfUBA&s=19
त्याचबरोबर पवार कुटुंबियांचे निकटवर्तीय आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील शरद पवारांच्या स्वास्थ्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की ‘आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे. त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा. आदरणीय पवार साहेब,आराम करा आणि काळजी घ्या.
आदरणीय पवार साहेबांची Covid टेस्ट positive आली आहे.त्यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो,या सदिच्छा..!
आदरणीय @PawarSpeaks साहेब,आराम करा आणि काळजी घ्या.#GetwellSoon— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 24, 2022
त्यामुळे आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे नेते शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.