Share

आजोबांचा स्वँग; वयाच्या पंच्याहत्तरीत निघाले बाईकवरून अमरनाथ यात्रेला

इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही वयात व्यक्ती काहीही करू शकतो असे म्हणतात. असेच काहीसे सांगली जिल्ह्यातील एका ७४ वर्षांच्या व्यक्तीने दाखवून दिले आहे. या व्यक्तीने एवढ्या वयात असे काही केले आहे, जे वाचून तुम्हांला देखील धक्का बसणार आहे.

सांगली जिल्ह्यातील मिरज तालु्क्यातील ७४ वर्षाच्या व्यक्तीने दोन चाकी गाडीवर अमरनाथ यात्रा सुरू केली आहे. त्यांच्या या यात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्यक्तीचे नाव जयवंत केदार चव्हाण असे आहे. तो मुळचा महाराष्ट्रातील मिरज येथील रहिवाशी आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगण्यात येत आहे की, जयवंत केदार चव्हाण हे दरवर्षी अशाच प्रकारे दोन चाकी गाडीवरून अमरनाथ यात्रा करतात. माहितीनुसार, त्यांनी ६ वर्षे पायी तर १२ वर्षे सायकलवर अमरनाथ यात्रा केली आहे. २०१४ पासून ते मोटारसायकवर ही यात्रा करतात.

एवढं वय असून देखील यात्रेतील उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. याबद्दल जयवंत केदार चव्हाण यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ते रोज ५०० किमी प्रवास करतात. मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे यात्रा बंद होत्या पण या काळातही यांनी अमरनाथ यात्रा चुकवली नाही.

त्यांचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ जेव्हा ते श्रीनगरमध्ये प्रवासात होते तेव्हा काढण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान त्यांचे वय ७५ च्या घरात असूनही दरवर्षी या यात्रेसाठी २६३० किमीचे अंतर गाडीवर पार करत असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अमरनाथ यात्रेला हिंदू धर्मीयांसाठी विशेष महत्त्व आहे. अमरनाथ गुहा हे भगवान शिवाच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे. अमरनाथला तीर्थक्षेत्र म्हटले जाते कारण येथेच भगवान शिवाने माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले अशी मान्यता आहे. दरवर्षी लाखो भाविक अमरनाथला जातात.

इतर

Join WhatsApp

Join Now