Share

क्षुल्लक वाद बेतला आजोबांच्या जीवावर, नातवाने फावड्याने वार करत काढला काटा, वाचून हादराल

उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्ये भिंतीवरील वादामुळे नातवानेच आपल्या आजोबांवर फावड्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भिंतीवरून वाद झाल्यामुळे आजोबांनी आपल्या नातवाच्या कानशिलात लगावली होती. या गोष्टीचा राग मनात धरून नातवाने आजोबांची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च रोजी आजोबा शत्रोहन पाल यांची नातू सतीशने हत्या केली आहे. शत्रोहन रात्रीच्या वेळी शेतावर पहारा देण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर सतीशने फावड्याने वार केले. घटनेची माहिती पोलिसांना लागताच त्यांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

शत्रोहन पाल यांच्यासोबत सतीशचे घरातील भिंतीवरून वाद झाले होते. या वादात शत्रोहन पाल यांनी नातू सतीशच्या कानशिलात लगावली. यामुळे संतप्त झालेल्या सतीशने आजोबांचा काटा काढण्याचे ठरविले. 20 मार्च रोजी शत्रोहन शेतात झोपले असतानाच त्यांच्यावर सतीशने फावड्याने वार केले.

त्यामुळे पूर्णपणे जखमी झालेल्या शत्रोहन यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना सतीशवर संशय आला. त्यांनी पुढील कारवाई करत सतीशला ताब्यात घेतले. दरम्यान आपणच आजोबांची हत्या केली असल्याचे सतीशने कबूल केले आहे.

पोलीस लवकरच सतीशला सुनावणीसाठी न्यायालयात हजर करणार आहेत. शत्रोहन यांच्या हत्येमुळे पाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर कुटुंबाने देखील सतीशवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलीस सतीशची चौकशी करीत आहेत.

महत्वाच्या बातम्या
सीमेवरील जवानांची नजर चुकवून बांगलादेशातील रहिवासी भारतात दाखल; कारण ऐकून व्हाल शॉक
शरद पवारांना नास्तिक म्हणणारे राज ठाकरेच निघाले नास्तिक? वाचा व्हायरल पोस्ट आणि त्यामागील सत्य
‘मेरा ढोला नी आया ढोला’, सारा तेंडूलकर मॅच पाहायला आल्यानंतर शुभमन गिल झाला ट्रोल, पहा मीम्स
“चुकीचा इतिहास मांडणाऱ्या विकृत व्यक्तीच्या प्रेमात अडकल्यामुळे राज ठाकरे संभ्रमित झाले आहेत”

ताज्या बातम्या क्राईम

Join WhatsApp

Join Now