सध्या समाजात मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आपण नेहमी पाहतो. बेटी म्हणजे धनाची पेटी असं न म्हणता मुलगी म्हणजे खर्चाला भार, या विचाराने तिला “नकोशी” केले जाते. यामुळे मुलीचा जन्मचं नाकारण्याची प्रवृत्ती समाजात वाढत आहे.
मात्र सध्या मुलीच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत आहेत. हे सांगण्याचे कारण म्हणजे पुण्यात स्त्री जन्माचे अनोखे स्वागत करण्यात आले आहे. थेट हेलिकॉप्टरमधून चिमुकल्या मुलीलला आणलं घरी आणलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
वाचा सविस्तर.. शेळगावच्या (ता. खेड) झरेकर कुटुंबियांनी आपल्या चिमुकलीचं हटके स्वागत केलं आहे. बाळाला त्यांनी चक्क हेलिकॉप्टरमधून घरी आणलं. यामुळं सध्या सर्वत्र झरेकर कुटुंब चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. सध्या या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव होतं आहे.
दरम्यान, एकीकडे स्त्री भ्रूण हत्त्येचे प्रमाण कमी व्हावे आणि मुलींचा जन्मदर वाढवा यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे खरच कुठं तरी समाजाची मानसिकता बदलत आहे याचं जिवंत उदाहरण आज पाहायला मिळाल आहे. मुलीच्या जन्माचे अनोख्या पध्दतीने स्वागत करत एक आदर्श घालून दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
मुलीच्या लग्नासाठी नव्हते पैसे, आईने रचलं थरारक कारस्थान; वाचून बसेल जबर धक्का
VIDEO: मालकासाठी नव्हे तर ‘या’ साठी 8 KM रुग्णवाहिकेच्या मागे धावला घोडा; कारण वाचून रडालं
प्रेयसीला गुपचूप भेटायला आलेल्या तरुणाला घरच्यांनी पकडले अन्…असे काही केले की, वाचून बसेल धक्का
सुजात आंबेडकरांचे राज ठाकरेंना थेट आव्हान; म्हणाले, ‘मुस्लिमांच्या अंगाला हात लावू देणार नाही’