पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका रिअॅलिटी शोदरम्यान खिल्ली उडवल्याचं धक्कादायक प्रकरणं नुकतंच समोर आलं आहे. या प्रकरणी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने झी एंटरटेनमेंट इंटरप्राइजेज लिमिटेडला नोटीस पाठवली आहे. सात दिवसांच्या आत मीडिया हाऊसला उत्तर देणं बंधनकारक असल्याचं सांगण्यात येत आहे.
तामिळनाडूमधील भाजपच्या आयटी आणि सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष सीटीआर निर्मल कुमार यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई करत मंत्रालयाने मीडिया हाऊसला सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. छोट्या पडद्यावरील ‘ज्युनियर सुपर स्टार्स सीझन ४’ या रिअॅलिटी शोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचं विडंबन केल्याचा आरोप वाहिनीवर करण्यात आला आहे.
झी तामिळवर प्रसारित होणाऱ्या ‘ज्युनियर सुपर स्टार्स सीझन ४’ या रिअॅलिटी टेलिव्हिजन शोमध्ये दोन बाल स्पर्धकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कथितपणे खिल्ली उडवणारे स्किट सादर केल्याचा आरोप भाजपने केला आहे. हे स्किट १५ जानेवारी रोजी प्रसारित करण्यात आले होते आणि एपिसोडमध्ये, लोकप्रिय तमिळ ऐतिहासिक राजकीय व्यंगचित्र इमसाय अरसन २३ पुलिकेसी मधील राजा आणि मंत्री म्हणून वेषभूषा केलेली दोन मुले सिंधिया नावाच्या देशाच्या राज्यकर्त्याची चेष्टा करताना दिसले.
शोच्या कंटेंटचे हिंदीसह इतर भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मीडिया हाऊसला नोटीसवर सात दिवसांत उत्तर देण्यासाठी वेळ दिला आहे. इतकंच नाही तर पंतप्रधानांची खिल्ली उडवल्याप्रकरणी या शोच्या प्रसारणाबाबत स्पष्टीकरणदेखील मागितलं आहे.
दरम्यान, निर्मल कुमार यांनी पुढे तक्रारीत, कार्यक्रमादरम्यान मुले जाणूनबुजून पंतप्रधान मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करत होते. शोमध्ये नोटाबंदी, पंतप्रधानांच्या विविध देशांचे राजनैतिक दौरे आणि पंतप्रधानांच्या पोशाखाबद्दल निंदनीय टिप्पणी करण्यात आल्याचे म्हटले आहे.
तर दुसरीकडे या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचे मुख्य क्लस्टर ऑफिसर सिजू प्रभाकरन यांनी सांगितल्याप्रमाणे, ते कार्यक्रमाशी संबंधित सर्व प्रकारचा भाग काढून टाकणार आहेत. तसंच याविषयी लवकरच स्पष्टीकरण देतील,’ असे त्यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
श्रद्धा म्हणून नाही तर मंदिरात असणाऱ्या घंटेमागे आहे वैज्ञानिक कारण, शरीरावर होतो ‘हा’ परिणाम
‘या’ भारतीय क्रिकेटपटूने संघ सहकाऱ्याच्या पाठीत खंजीर खूपसत त्याच्या बायकोशी संबंध ठेवले होते
पुण्यातून अपहरण झालेला डुग्गू अखेर १० दिवसांनी सापडला; ३०० पोलीस घेत होते शोध
पाठीत खंजीर खूपसत ‘या’ पाच खेळाडूंनी मित्राच्या पत्नी आणि आईसोबत ठेवले होते संबंध