Share

Dahihandi: दहीहंडी उत्सवात नाचता नाचताच गोविंदाचा मृत्यू; संपुर्ण सोहळ्यावर पसरली शोककळा

wasant chaugule (1)

दहीहंडी(Dahihandi): गुरुवारी कृष्ण जन्माष्टमी पार पडली. शुक्रवारी संपूर्ण राज्यात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कोरोना काळामुळे २ वर्षांनी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आल्याने लोकांचा उत्साह नजरेत भरणारा होता. परंतु, या भरघोस आंनदात काही गोविंदांना आपला जीव गमवावा लागला. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात शुक्रवारला एका गोविंदाचा नाचतांना मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र शोककळा पसरली.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेल्या गोविंदाचं नाव वसंत लाया चौगुले असं आहे. दापोली तालुक्यातील पाज पंढरी गावात कोळी समाजाकडून दहीहंडीचा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या कार्यक्रमध्ये होमाआळी मंडळातील सदस्यसुद्धा सामील झाले होते. यामध्ये चौगुले सहभागी झाले होते.

दरम्यान, चौगुले नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आली आणि त्यांना तीव्र ह्रदयविकाराचा झटका आला. नाचताना ते जमिनीवर पडले . त्यांच्यासोबत असलेल्या बाकी गोविंदांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले. मात्र रुग्णालयात जाण्यापूर्वी वाटेतच त्यांनी मृत्यूला कवटाळले.

सगळीकडे दहीहंडीचा सण उत्साहात चालू होता, चौगुले यांचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. चौगुले यांच्या मृत्यूची बातमी सर्वांना कळताच, इतर सर्व गोविंदांवर दुःखाचे सावट पसरले आहे. शुक्रवारी अनेक गोविंदांचे प्राण गमावल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईतील तब्ब्लल १११ गोविंदा जखमी झाले आहेत.

१८ तारखेला मुख्यमंत्र्यांनी गोविंदांच्या बाबतीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले. दहीहंडीला आता खेळ म्हणून जाहीर केले आहे. साहसी खेळात दहीहंडी सामील करत मुख्यमंत्र्यांनी गोविंदांना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. प्रो कब्बडी प्रमाणेच आता प्रो गोविंदा स्पर्धासुद्धा राबवण्यात याव्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

या निर्णयाला अनेक क्षेत्रातून विरोधही होत आहे. विरोधात सर्वात जास्त विद्यार्थी सहभागी आहेत. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी ट्विटच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आव्हान केले आहे. हा निर्णय मागे घ्या असेही ते बोलले आहेत. समोरील घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या
Devendra Fadanvis : “खोकेवाल्यांच्या सरकारने निष्पाप जिवांचे बळी घेतले. फडणवीस, आता कोणाचा राजीनामा मागणार?”
Mahavikas Aghadi : विधानपरिषद सभापती निवडीत भाजप-शिंदेंच्या अडचणीत वाढ, ‘मविआ’ला मात्र होणार फायदा
‘गुवाहाटीला जाताना मी एकटा आणि सांगून गेलो, पण…,’ उदय सामंतांचा ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट
Yuzvendra Chahal : धनश्री वर्माने चहल आडनाव हटवताच केला ‘तो’ फोटो शेअर, म्हणाली, राजकुमारी दुःखाचं रूपांतर..    

इतर आरोग्य तुमची गोष्ट राज्य

Join WhatsApp

Join Now