बच्चू कडू(Bacchu Kadu): शिंदे आणि भाजप सरकार स्थापन होऊन १ महिन्याच्या वर कालावधी झाला. तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. आज प्रतीक्षा संपली. अखेर या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. सकाळी ११ वाजता मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात झाली. एकूण १८ जणांची नावं समोर आली आहे. ९ भाजपचे तर ९ शिंदे गटातील मंत्र्यांची नावे आहेत.
शपथविधीमध्ये अपक्षांना सध्या स्थान देण्यात आलेले नाही. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी घटक पक्षांशिवाय सरकार चालू शकणार नाही, असा इशारा देऊन नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यमंत्री असलेले बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले होते. राज्यमंत्रीपद सोडून आल्याने त्यांचा समावेश मंत्री मंडळात होईल अशी अपेक्षा होती.
मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे बच्चू कडू यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज सकाळी ११ वाजता या भावी मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. शपथविधी सोहळा पार पडण्याआधी सह्याद्री अतिथीगृहावर शिंदे गटाची बैठक पार पडली.
बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
‘अपक्ष आमदार आणि मित्रपक्षाशिवाय सरकार चालत नाही. निश्चितच त्याचा विचार झाला पाहिजे. शेतकरी बांधव आणि अपंग बांधवांचं भलं झालं पाहिजे, त्यासाठी आम्ही आलो आहोत,’ असे बच्चू कडू म्हणाले आहेत.
तसेच, ‘असं असलं तरी चांगलं आणि नसलं तरी चांगलं आहे. मंत्रिपदासाठी नाव चर्चेत येण्यापेक्षा शेतकरी आणि अपंग बांधवासाठी काम केले तर चांगले आहे. मी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी आलो आहे. त्यांना भेटल्यानंतर निर्णय होणार आहे,’ अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली.
सोमवारी रात्रीपर्यंत ८ भाजपा आणि ८ शिंदे गटातील नेते मंत्रीविस्तारात भाग घेतील, असे ठरले होते. पण रात्री उशीरा अब्दुल सत्तार आणि मंगलप्रभात लोढा यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या मंत्रिमंडळात बच्चू कडूंना स्थान दिले जाईल, अशी चर्चा होती. पण त्यांचे नाव न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
बिहारमधील भाजप-जेडीयूचे सरकार कोसळले; नितीशकुमारांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
अंगात त्राण नसताना, ताप असताना आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर गरजले; म्हणाले…
Pradip Patwardhan Died : दिग्गज मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे अकाली निधन; मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा
Pradip Patwardhan Died : दिग्गज मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे अकाली निधन; मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा