Share

गोपीनाथ मुंडेची ‘ती’ विनंती बाळासाहेबांनी एका क्षणात मान्य केली होती; उद्धव ठाकरेंनी सांगीतला किस्सा

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद येथे होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेची चर्चा सुरू होती. अखेर काल ही विराट सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली. तसेच यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला आहे.

या सभेत उद्धव ठाकरेंनी काल भाजपचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरेंनी या सभेदरम्यान दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची एक आठवण सांगितली. म्हणाले, संभाजीनगरच्या विषयी एकदा गोपीनाथ मुंडे घरी आले होते. तेव्हा त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महापौर पद आम्हाला द्या, अशी मागणी केली.

तेव्हा बाळासाहेबांनी त्यांची विनंती एका क्षणात मान्य केली, आणि भाजपचाच महापौर होईल असे सांगितले. बाळासाहेब ठाकरे कागदावर आकडेमोड करत बसले नाहीत, की आमचे नगरसेवक किती तुमचे नगरसेवक किती वगैरे, एका क्षणात त्यांनी भाजपला महापौर पद दिलं.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले, औरंगाबाद महापालिकेत भागवत कराड महापौर झाले. आज ते केंद्रात गेले. भाजपवर टीका करताना म्हणाले, आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात जर मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी भाजपने शिकवा. ते जी भाषा वापरत आहे ती भाषा आमचे प्रवक्ते वापरणारच नाही असं नाही.

आमचा संयम सुटला तर आम्ही तेही करू शकतो. तसेच म्हणाले, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील. असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. ठाकरे यांनी भाजप बरोबरच संघावर देखील टीका केली.

म्हणाले, हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं? जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला, असे म्हणत आपली हिंदुत्वाची भूमिका स्पष्ट केली.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now