uddhav thackeray : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फुट पडली. ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. शिंदे यांनी बंड करताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. दोन्ही गटातील नेते मंडळी एकमेकांवर जहरी शब्दात आरोप परत असल्याच आता पाहायला मिळत आहे.
तर दुसरीकडे शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सत्तांतर मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशातच एक शिंदे गटातून एक वेगळी बातमी समोर येतं आहे. एकीकडे शिंदे गटातील नेते उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत आहे. तर दुसरीकडे मात्र आता शिंदे गटातील नेताच उद्धव ठाकरेंचे स्वागत करणार असल्याच वृत्त समोर आलं आहे.
यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे गटातील अकोला जिल्ह्याचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया हे उद्धव ठाकरेंचे स्वागत करणार असल्याच वृत्त समोर आलं आहे. यवतमाळमधील नेते संजय देशमुख हे शिंदे गटातील नेते संजय राठोड यांचे विरोधक आहेत.
नुकतच संजय देशमुख यांनी भगवा हाती घेतला आहे. देशमुख यांच्या शिवसेना प्रवेशानंतर उद्धव ठाकरे पोहरादेवीच्या दर्शनाला जाणार आहेत. अशातच शिंदे गटातील अकोल्याचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.
त्यांच्या या विधनाने शिंदे गटात एकच खळबळ उडाली आहे. माध्यमांशी बोलताना बाजोरिया यांनी म्हंटलं आहे की, जर उद्धव ठाकरे साहेब पोहरा देवी जात असतील, तर अकोला शिवनी विमानतळावर त्यांचे निश्चितच स्वागत केले जाईल, असं बाजोरिया यांनी म्हंटलं आहे.
दरम्यान, पुढे बोलताना बाजोरिया यांनी म्हंटलं आहे की, उद्धव ठाकरे मोठे नेते आहेत. बाळासाहेबांनी जी चळवळ निर्माण केली होती, ती चळवळ त्यांच्यामध्ये दिसत नव्हती. म्हणून त्यावर आम्ही विचार करू, पण नेते तर आहेस ना महाराष्ट्राचे. कारण लहान माणूस नाहीये, त्यामुळे यात काही शंका नाहीये, असं बाजोरिया यांनी म्हंटलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
सनी देओलच्या मुलाचा झाला गुपचूप साखरपुडा; काय आहे नेमकं यामागील कारण वाचा
Sunny Deol: सनी देओलच्या ‘चुप’ने बाकीच्या चित्रपटांना केलं ‘चिडीचुप’ पहिल्याच दिवशी केली विक्रमी कमाई
Sunny Deol: राहायला नव्हते घर, उपाशीपोटी काढले दिवस, अजूनही मला.. सनी देओलच्या अभिनेत्रीची कहाणी ऐकून डोळ्यातून पाणी येईल






