आज राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिष्ठेची केलेल्या खानापूर नगरपंचायतीत भाजपला महाविकास आघाडीने सर्वच्या सर्व जागा जिंकत पडळकरांना जोरदार धक्का दिला आहे.
खानापूर नगरपंचायतीत सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस आघाडीला 9 तर राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित आघाडीला 7 जागा मिळाल्या आहेत. तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला असून आमदार गोपीचंद पडळकर नेतृत्व करत असलेल्या भाजपच्या पँनलला भोपळाही फोडता आला नाही.
खानापूर ग्रामपंचायत ही नगरपंचायत झाल्यापासून ही दुसरी पंचवार्षिक निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जनता आघाडी आणि भाजप अशी तिरंगी लढत यावेळी झाली होती. त्यात भाजपचा दारुण पराभव झाला.
शिवसेना-काँग्रेसच्या पॅनेलचं नेतृत्व आमदार अनिल बाबर यांनी केलं होतं. त्यामुळे या आघाडीने 17 पैकी 9 जागा जिंकून बहुमत मिळवलं आहे. त्याचबरोबर खानापूर नगरपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न भाजपने गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली केला. परंतु त्यास अपयश आले आहे.
त्यामुळे आता या निवडणुकीचा परिणाम आगामी जिल्हा परिषद आणि सोसायट्यांच्या निवडणुकीतही होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार अनिल बाबर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या कॉंग्रेस-शिवसेना आघाडीने सत्ता कायम राखली.
तर राष्ट्रवादी पुरस्कृत जनता आघाडीचे नेतृत्व माजी आमदार सदाशिव पाटील यांनी केले. आणि भारतीय जनता पक्षाच्या आघाडीची सर्व जबाबदारी ही आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडे होती. त्यामुळे आता राज्यातील विविध प्रश्नांवर सतत जोरदार भूमिका मांडणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांच्या पँनलच्या पराभवाची चर्चा महाराष्ट्रभर होत आहे.
महत्वाच्या बातम्या
कर्णधार नसला म्हणून काय झालं? पुन्हा दिसली मैदानात विराटची आक्रमता; पहा मैदानात काय घडलं?
भाजपच्या चित्रा वाघांनी केले रोहित पाटलांचे तोंडभरून कौतुक; म्हणाल्या आज आबा असते तर..
‘या’ तारखेनंतर कोरोनाची तिसरी लाट ओसरणार; तज्ञांनी दिली दिलासादायक माहिती