sharad pawar : बारामतीच्या जाणता राजाने हात लावला तर राख होते; पडळकरांची शरद पवारांवर जहरी टीका

gopichand padalkar criticize sharad pawar  | शिवसेनेचे चिन्ह सध्या गोठवण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेले हे चिन्ह सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. त्यामुळे काही नेते यावर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहे.

आता यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या गटाला एकत्रित चिन्ह दिले पाहिजे. ते चिन्ह म्हणजे खंजीर असले पाहिजे. त्यासाठी मी निवडणूक आयोगाला पत्र लिहीणार आहे, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी एकत्रित करुन त्यांना खंजीर हे चिन्ह दिले पाहिजे. मशाल आता रुजवायला वेळ लागेल. पण खंजीर म्हटलं तर लोकांच्या लगेच लक्षात येईल. कारण राष्ट्रवादीचा जन्मच खंजीरातून झाला आहे. आता एक नवा खंजीर खुपसणारा पवारांनी निर्माण केला आहे, असे गोपीचंद पडळकरांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी निवडणूक आयोगाला याबाबत पत्र लिहिणार आहे. त्यामध्ये राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून त्यांना आणि उद्धव ठाकरे यांना खंजीर हे चिन्ह दिले पाहिजे. फक्त ते एकमेकांत घुसवू नका, अशी घणाघाती टीकाही यावेळी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

मी ऐकलं होतं की एक राजा होता. त्याचा हात लागला की कोणत्याही गोष्टीचं सोनं व्हायचं. पण बारामतीच्या जाणता राजाचा हात लागला तर राख होते, हे मी प्रत्यक्षात बघितलं. राष्ट्रवादीच्या नादाला जो जो लागेल, त्याची राख होते. आता शिवसेनेचीही राख झाली, असेही यावेळी गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

राज्यामध्ये कर्मचारी आणि असंघटित कर्मचाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम काही संघटना करतात. पण काही लोकांनी त्यांचा फक्त राजकारणासाठी वापर करुन घेतला. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संघटनांनी न्याय दिलेला नाही, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-
namibia : फुकटात मिळालेले चित्ते भारताला पडणार महागात, नामिबियाने बदल्यात मागितली ‘ही’ मौल्यवाण वस्तु
Uddhav thackeray : उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत, मशाल चिन्हही हातातून जाणार? प्रकरण उच्च न्यायालयात 
shinde group : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीची बारी! शिंदेंनी राष्ट्रवादीचा बडा नेता फोडत थेट पवारांना दिला धक्का