गेल्या काही दिवसांमध्ये भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून शरद पवारांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. नुकतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रोहित पवारांनी चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याचाच मुद्दा धरून पडळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला होता.
त्याचबरोबर रोहित पवारांना देखील त्यांनी लक्ष केलं होतं. यावरूनच आता रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकरांवर निशाणा साधला. भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकरांना आवरायला हवं, असं रोहित पवार यांनी म्हंटले आहे. ‘गोपीचंद पडळकर जेव्हा अहिल्यादेवींच्या नावाचा वापर करतात, तेव्हा ते खालच्या दर्जाचं राजकारण करतात,’ असंही त्यांनी म्हंटले.
तर आता रोहित पवारांच्या टीकेला गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना पडळकर म्हणतात, ‘चौंडी येथील कार्यक्रमात शरद पवार म्हणतायत की, अहिल्यादेवींच्या पावलावर पाऊल ठेऊन रोहित पवार काम करतोय. रोहितला अजून शेंबुड काढायचा कळतो का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना पडळकर म्हणतात, “रोहित पवारांची अजून लायकी नाहीये. शरद पवारांनी रोहित पवारांना सादर करायचं, अहिल्यादेवींचा कार्यक्रम हायजॅक करायचा इतक्या लेव्हलचे, लायकीचे तुम्ही नाही. आता हे लोकांना कळालं आहे, अशा जहरी शब्दात पडळकर यांनी शरद पवार आणि त्यांचे नातू रोहित पवारांना लक्ष केलं आहे.
वाचा काय आहे वाद..? काही दिवसांपूर्वीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती होती. जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
पोलिसांनी चौंडीत जाण्यापासून गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला. ते म्हणाले, रोहित पवारांच्या अगोदर २९ मे रोजी अहिल्यादेवी होळकर कार्यक्रमासाठी मी परवानगी मागितली होती. पण रोहित पवारांना माझ्या अगोदर परवानगी दिली. रोहित पवारांच्या बापाने कायदा लिहिलाय का? असा सवाल करत गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली.
त्यावर रोहित पवारांनी ‘भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांनी गोपीचंद पडळकरांना आवरायला हवं,’ असं म्हणत रोहित पवार गोपीचंद पडळकरांना प्रत्युत्तर दिलं. त्याचाच धागा पकडत पुन्हा पडळकरांना रोहित पवारांना लक्ष केलं आहे. ‘रोहितला अजून शेंबुड काढायचा कळतो का?,’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महत्त्वाच्या बातम्या
केतकी प्रकरणात राज्यपालांची एंट्री, केस CBI कडे जाण्याची शक्यता; वाचा नेमकं काय घडलं..
तापानं फणफणलो होतो, १०२ ताप होता, तरीही…अशोकमामांनी सांगितला ‘तो’ जुना किस्सा
प्रचंड वादानंतरही प्राजक्ता माळी म्हणते ‘रानबाजारमधील ‘तो’ सीन माझ्या कारर्किदीतला बेस्ट’
‘मी घरी बसेन पण अन्य कुठल्या पक्षाचा झेंडा हाती घेणार नाही, शिवसेना माझ्या घरात, माझ्या मनात’