कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांना दिवाळीच्या सणासुदीच्या दिवसांत आनंदाची बातमी मिळणार आहे. या महिन्याच्या अखेरीस चांगली बातमी मिळण्याची आशा अनेक बातम्यांमधून व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, EPF खातेधारकांना आर्थिक वर्ष 2021-22 साठी व्याज मिळू शकते. यावेळी सरकार EPF खात्यावर 8.1 टक्के दराने व्याज देणार आहे. Govt, PF Account, EPFO, Pension Fund
मीडिया रिपोर्ट्सनुसार, EPFO ने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये PF खात्यावर मिळणाऱ्या व्याजाची गणना केली आहे. लवकरच ते खातेदारांच्या पीएफ खात्यात ट्रान्सफर केले जाईल. तुमच्या खात्यात किती पीएफ व्याज येईल, ते तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे आहेत यावर अवलंबून आहे. खात्यात जमा केलेल्या रकमेवर 8.1 टक्के दराने व्याज मिळेल.
जर तुमच्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा असतील, तर 8.1 टक्के दराने तुमच्या खात्यावर वार्षिक 8,100 रुपये व्याज येईल. त्याच वेळी, जर 10 लाख रुपये असतील तर खात्यात 81,000 रुपये व्याज म्हणून येतील. दरमहा पीएफ खात्यात जमा होणाऱ्या मासिक चालू शिल्लक आधारावर व्याज मोजले जाते.
वर्षाच्या शेवटी व्याज जमा केले जाते. तथापि, हे लक्षात घ्यावे की ईपीएफमध्ये जमा केलेल्या संपूर्ण रकमेवर व्याज उपलब्ध नाही. पीएमएफ खात्यातील पेन्शन फंडात जाणाऱ्या रकमेवर व्याज मिळत नाही. जर तुम्हाला पीएफमधील रक्कम तपासायची असल्यास तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर मिसकॉल द्यावा लागेल. त्यानंतर ईपीएफओच्या मेसेजच्या माध्यमातून पीएफची माहिती मिळेल. यासाठी तुमचं यूएन, पॅन आणि आधारकार्ड लिंक असणं आवश्यक आहे.
तसेच तुम्ही तुमचा बॅलन्स हा ऑनलाइन, उमंग अॅपवरून आणि एसएमएसच्या माध्यमातूनही तपासू शकता. एसएमएसवरून बॅलन्स तपासण्यासाठी तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 7738299899 वर EPFOHO लिहून मेसेज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बॅलन्सची माहिती मिळेल.
महत्वाच्या बातम्या-
Eknath Shinde : शिंंदे गटाला फक्त २० टक्के निधी तर भाजपला ८० टक्के निधी, खरी सत्ता भाजपचीच
ST Corporation : शिंदे सरकारने एसटी महामंडळाचा निधी रोखला; कर्मचारी पुन्हा संपावर जाण्याच्या तयारीत
Mathematics: माणूस नाही ह्युमन कॅल्क्युलेटर! मुलांना सोप्या पद्धतीने शिकवतो गणित, आता मिळाला १२० कोटींचा निधी