Share

केकेच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! केकेचे अखेरचे गाणे ‘या’ तारखेला होणार रिलीज

काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केकेचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. तरीही ते आजही चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. त्यांच्या निधनाची बातमी ते अजून पचवू शकले नाही. काही दिवसांपूर्वी केकेने एक गाणे रिलीज करणार असल्याची बातमी स्वतः पोस्ट करुन दिली होती.

या गाण्याची आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण केकेचं हे गाणं कालच रिलीज झालेलं आहे.केकेने ‘ शेर दिल द पिलीभात सागा ‘ या चित्रपटासाठी शेवटचे गाणे गायले आहे. ‘ धूप पानी बहने दे ‘ असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे गुलजार यांनी लिहिले असून शांतनू मोईत्रा यांनी संगीत दिले आहे.

‘ शेर दिल द पिलीभात सागा ‘ हा  चित्रपट झपाट्याने वाढत चाललेल्या शहरीकरणावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, नीरज काबी आणि सयानी गुप्ता हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शन आणि लेखन सृजित मुखर्जी यांनी केले असून २४ जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

केकेने १९९० च्या दशकात त्यांनी जाहिरातींमध्ये जिंगल्स गात संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी ११ भाषांमधील तब्बल ३५०० जिंगल्सला आवाज दिला आहे. त्यानंतर त्यांना पहिली मोठी ऑफर ए. आर. रेहमान यांनी त्यांच्या तमिळ चित्रपटातून दिली होती. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

हम रहे ना रहे कल, अलविदा,पल, बर्दाश्त नही कर सकता, दस बहाने कर के ले गये दिल, तडप, आंखो में तेरी अजिबसी अदा ये है, जरा सी दिल में दे जगह तू, खुदा जाने, तू ही मेरी शब है , तू जो मिला यांसारखी अनेक हिट गाणी त्यांनी गायली. त्यांच्या या गाण्यांनी सगळ्या तरुणाईला वेड लावले.

३१ मे रोजी ते कोलकात्यातील नजरूल स्टेडीयममध्ये कॉलेजमधील  एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांना गाणे गात असताना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. त्यांच्या या निधनाने चाहत्यांसोबत बॉलीवूडला चांगला धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now