शेतकऱ्यांना शेतकाम करण्यासाठी अनेक यंत्रांचा उपयोग करावा लागतो, यापैकीच एक आहे ट्रॅक्टर. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्यांना ट्रॅक्टर विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात प्रगती करण्यास अडथळे निर्माण होतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता देशातील मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे व त्यांनाही आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहित करावे यासाठी एक भन्नाट योजना आणली आहे.
शेतकऱ्यांना शेती कार्य करण्यासाठी, शेतीमध्ये कुठल्याही पिकाच्या लागवडीची पूर्वमशागत पासून ते काढणी करण्यापर्यंत ट्रॅक्टर खूप उपयोगात येते, यामुळे शेतीचे कामे वेळेत होतात तसेच यामुळे उत्पादनात वाढ देखील होते. मात्र, प्रत्येक शेतकऱ्यांला ट्रॅक्टर घेणं शक्य होत नाही.
शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी पुरेसा पैसा नसतो त्यांना भाडेतत्वावर ट्रॅक्टर आणून शेतीची पूर्वमशागत तसेच विविध शेत कार्य पार पाडावी लागतात तर काही शेतकरी बैलांच्या साह्याने शेतीची पूर्वमशागत व इतर शेत कार्य करतात, मात्र या पारंपारिक शेती पद्धती मुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन पदरी पडत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून देशातील मोदी सरकार गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी एका योजनेअंतर्गत सबसिडी देणार आहे.
ही सबसिडी ‘पीएम किसान ट्रॅक्टर योजना’ या नावाने दिली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अर्ध्या किंमतीत ट्रॅक्टर दिले जातील. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अनुदान देते. यामुळे शेतकरी कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकतात. यातील उर्वरित निम्मी रक्कम सरकार अनुदान म्हणून देते.
माहितीनुसार, केंद्र सरकारच्या या योजने व्यतिरिक्त देशातील अनेक राज्य सरकारे संबंधित राज्यातील शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान देत असते. या योजनेबाबत अधिक माहिती द्यायची म्हटलं तर, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मात्र एक ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठीच अनुदान दिले जाणार आहे.
ज्या शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल त्यासाठी सर्वांत आधी एप्लिकेशन करावं लागतं. काही कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य असते. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, जमिनीचा सातबारा उतारा, बँकेचे पासबुक तसेच बँकेचे स्टेटमेंट देखील लागते. याव्यतिरिक्त आपले पासपोर्ट साईज फोटो देखील अनिवार्य असतात.