पंतप्रधान किसान सन्मान योजना ही कृषी क्षेत्रातील सर्वात मोठी योजना मानली जाते.केंद्र सरकारने २०१९ मध्ये पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. ही केंद्र सरकार’द्वारे चालविण्यात येणारी योजना आहे. शेतकऱ्यांमध्ये या योजनेविषयी मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर ४ महिन्यांच्या अंतरानं २ हजार रुपयांचा हप्ता, अशा पद्धतीनं ३ हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.
यामुळे देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळते यामुळे त्यांचे जीवन सुखकर होण्यास मदत होत आहे. पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात शिवाय आता सरकार त्यांना तीन लाख रुपयांचे कर्ज देखील उपलब्ध करून देत आहे.
या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने या योजनेशी संबंधित शेतकऱ्यांचे क्रेडिट कार्ड बनवण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे. सध्या संपूर्ण देशात किसान भागीदारी, प्राथमिकता हमारी. या अभियानांतर्गत शिबिरांचे आयोजन करून शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे.
या शिबिरांच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधीशी संबंधित प्रत्येक शेतकऱ्याला क्रेडिट कार्ड बनवून दिले जाणार आहे. हे केंद्र सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान २५ एप्रिलपासून सुरू झाले असून 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे क्रेडिट कार्ड बनवता येणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकरी सहकारी बँकेच्या माध्यमातून या विशेष कार्डद्वारे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहज मिळवू शकतात. या कार्ड द्वारे दिल्या जाणाऱ्या कर्जाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे या कर्जावरील व्याजदर हा अतिशय कमी आहे. कारण की या कर्जावर असलेल्या व्याजावर सरकारकडून सबसिडी दिली जाते, ज्यामुळे व्याजदर कमी होतो.
कशी असेल व्याजदारावर सवलत
किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून घेतलेल्या कर्जावर ९ टक्के दराने व्याज आकारले जाते. परंतु जर तुम्ही कर्जाची वेळेवर परतफेड केली तर तुम्हाला व्याजात ३ टक्के सवलत या योजनेद्वारे दिले जाते. याशिवाय केंद्र सरकारकडून २ टक्के अनुदान दिले जाते. जर तुम्ही वेळेवर कर्जाची परतफेड केली तर तुम्हाला ३ टक्के प्रोत्साहन दिले जाते. अशा प्रकारे, केसीसी’सह, तुम्हाला ४ टक्के व्याजाने कर्ज मिळते. यामुळे केसीसी अर्थात किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत दिले जाणारे हे कर्ज देशातील सर्वात स्वस्त कर्ज असल्याचा दावा सरकारकडून केला जातो.यामुळे निश्चितच किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांसाठी वरदान सिद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
बातमी कामाची! बेरोजगारांसाठी ठाकरे सरकार दरमहा ५ हजार रूपये भत्ता देणार; पण असतील ‘या‘ अटी
राज ठाकरेंची सभा उधळून लावण्यावर भीम आर्मी ठाम; म्हणतीय पोलिसांनी परवानगी दिली तरी…
९० वर्षीय ‘पद्मश्री’ कलाकाराची बिकट अवस्था, मोदी सरकारने सामान रस्त्यावर फेकत घराबाहेर हाकलले
९० वर्षीय ‘पद्मश्री’ कलाकाराची बिकट अवस्था, मोदी सरकारने सामान रस्त्यावर फेकत घराबाहेर हाकलले