Share

चाहत्यांसाठी गुड न्युज! बाॅलीवूडमधील सर्वाधिक बोल्ड सिनेमाचा रिमेक लवकरच येणार; मल्लिकाचा खुलासा

सध्याच्या काळात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बोल्ड फोटोशूटपासून ते बोल्ड सिनेमांची एकच चर्चा असते. आता बॉलिवूडमध्ये किसींग, सेक्स, तसेच शिव्या अशा गोष्टी कॉमन झाल्या आहेत. यामुळे बॉलिवूड वर काहीजण वाईटरीत्या टीका देखील करत आहेत.

अनेकजण बॉलीवूड ही पॉर्न फिल्म इंडस्ट्री झाली आहे अशी टीका करतात. त्यात ओटीटीमुळे बोल्ड सिनेमांना एक रस्ता मिळाला आहे. अशा सिनेमांना पाहणारा एक चाहता वर्ग देखील आहे. मर्डर या सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर २००४ साली आलेल्या या सिनेमाने तेव्हापासून ते आजपर्यंत खूप मोठा प्रेक्षकवर्ग धरून ठेवला आहे.

या चित्रपटाची तेव्हा प्रचंड क्रेझ होती जी आजही आहे. त्यावर आजही अनेक मीम्स बनतात आणि सिनेमावर आजही तितकीच चर्चा केली जाते. या सिनेमामुळे मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मी प्रचंड प्रसिध्द झाले होते. याच सिनेमापासून इम्रानला सिरियल किसर असा टॅगही पडला.

त्यानंतर, इम्रान अनेक सिनेमांमधून दिसला मात्र, मल्लिका शेरावत मात्र तिच्या ‘हिस्स’ या सिनेमानंतर रूपेरी पडद्यावर फारच कमी दिसली. आता ती बऱ्याच वर्षानंतर ‘RK/RKay’ या आगामी सिनेमातून दिसणार आहे. नुकतीच या सिनेमाची एक झलक प्रेक्षकांसमोर आली आहे.

या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान मल्लिकाने एक खुलासा केला आहे. तिला नुकत्याच एका मुलाखतीत विचारण्यात आले की ‘मर्डर’ चा रिमेक होणार का.. तर त्यावर तिचे उत्तर होते की, चाहत्यांना आपलं काम पाहचंय असतं मग ते रिमेकच्या मार्गाने असो वा आणखी काही.

तिच्या या उत्तरामुळे नक्कीच ‘मर्डर’ या सिनेमाचा रिमेक येणार अशी चर्चा सुरू आहे. तसेच मल्लिका म्हणाली, मी यापुढे ओटीटीवर अनेक सिनेमे करते आहे. मी चांगल्या स्क्रिप्टच्या यापुढे शोधात राहणार आहे. त्यामुळे तसेच सिनेमे मी करेन आणि त्यांच्या रिमेकमध्ये मला काम करायला आवडेल.

मनोरंजन

Join WhatsApp

Join Now