Share

बुलेटप्रेमींसाठी गुड न्युज! भन्नाट फिचर्ससह येतेय नवीन बुलेट ३५०; फिचर्स वाचून खुष व्हाल

बुलेट वरती बसण्याचा एक वेगळाच रुबाब असतो. यासाठी लोकांचे बुलेट घेण्याकडे आकर्षण असते. आता बुलेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. Royal Enfiled कंपनी आता नव्या मोटरसायकलवर(बुलेट) काम करत आहे. याचे फिचर्स ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

रॉयल एनफील्ड कंपनी नव्या मोटरसायकलवर काम करत आहे. या मोटरसायकलचे नाव नेक्स्ट जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट 350 असं आहे. या Royal Enfield 350 नेक्स्ट जनरेशन मध्ये येणाऱ्या काही खास फीचर्स बद्दल आम्ही तुम्हांला माहिती देणार आहोत.

या नव्या मॉडेल्समध्ये डाउनट्यूब फ्रेम वापरण्यात आली आहे. जी ड्युअल क्रॅडल फ्रेममध्ये आहे. हे डिझाईन जबरदस्त मजबूत दिसत आहे. अशा परिस्थितीत, कंपनी सस्पेंशन आणखी मजबूत करू शकते. या मॉडेल्समध्ये रायडिंग आणि हँडलिंगमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

नेक्स्ट जनरेशन बुलेट 350 ला रेट्रो इंस्पायर्ड डिझाईन देण्यात येणार आहे. हे सध्याच्या मॉडेल्स सारखे असेल पण यात थोडे फार बदल केले जाणार आहेत. या मॉडेल्सकडे पाहिल्यावर सर्वात मोठा बदल त्याच्या टेललाइट्सवर झालेला दिसेल. यात नवीन फेंडरही देण्यात आलं आहे. याचे सीट सिंगल पीसमध्ये असेल.

नेक्स्ट जनरेशन बुलेट 350 मध्ये 350 मध्ये 349cc, एअर/ऑइल कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन मिळेल, जे क्लासिक 350 सारखे असेल. हा 5 स्पीड गिअरबॉक्स असू शकतो. ही या बुलेट चे पॉवर ट्रेन बद्दल वैशिष्ट्ये सांगता येतील. तसेच या जनरेशन बुलेट 350 मध्ये कमीत कमी इक्वीपमेंट दिसतील. या बाईकला पुढच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि मागे ड्रम ब्रेक्स मिळतील.

माहितीनुसार,  नेक्स्ट जनरेशन रॉयल एनफील्ड 350 ही नवीन बुलेट वर्षाच्या अखेरीस भारतात लॉन्च होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याचे फिचर्स पाहता सध्याच्या मॉडेल्स पेक्षा त्याची किंमत थोडी जास्त असेल. याची किंमत 1.45 लाख रुपये ते 1.60 लाख रुपये पर्यंत असेल.

 

इतर

Join WhatsApp

Join Now