Share

Gold : सोने ३६ हजार रुपयांनी स्वस्त होणार, कधीपर्यंत उतरणार भाव? वाचा काय म्हणतात तज्ञ..

Gold

Gold : सध्या भारतीय बाजारात सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत. प्रति 10 ग्रॅम 91,000 रुपयांवर पोहोचलेले 24 कॅरेट सोने सामान्य खरेदीदाराच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पण येत्या काळात हे चित्र बदलू शकते, असा अंदाज जागतिक विश्लेषक संस्था मॉर्निंगस्टारने व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, पुढील काही महिन्यांत *सोन्याच्या किमतीत तब्बल 40 टक्क्यांहून अधिक घसरण होऊ शकते, ज्यामुळे मध्यमवर्गीयांसाठी पुन्हा एकदा सोने परवडणारे ठरेल.

सोन्याचे दर 55,000 रुपयांवर येणार?

सध्या जागतिक बाजारात सोन्याची किंमत प्रति औंस 3,100 डॉलर्सच्या आसपास आहे. पण मॉर्निंगस्टारचे रणनीतिकार जॉन मिल्स यांच्या मते, या दरात *घसरण होऊन ते 1,820 डॉलर्सपर्यंत खाली येऊ शकते. त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावर होऊन, *प्रति 10 ग्रॅम दर 55,000 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.

घट होण्यामागची प्रमुख कारणं:

  1. पुरवठा वाढला: ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांतील सोन्याचे उत्पादन लक्षणीयरीत्या वाढले आहे. याशिवाय, पुनर्नवीनीकरण केलेल्या सोन्याचा साठाही वाढत आहे.
  2. मागणी घटली: गेल्या वर्षी विक्रमी प्रमाणात सोने खरेदी करणाऱ्या जगभरातील मध्यवर्ती बँकांनी यंदा खरेदी थांबवण्याची किंवा कमी करण्याची शक्यता वर्तवली आहे.
  3. बाजार संपृक्तता: सोन्याच्या क्षेत्रात विलीनीकरण आणि अधिग्रहण वाढल्यामुळे बाजारात पुरवठा वाढला आहे. त्यामुळे मागणी-पुरवठा ताळमेळ बिघडल्याचे संकेत आहेत.

विरोधाभासी मतं देखील

जरी मॉर्निंगस्टारने घसरणीचा अंदाज व्यक्त केला असला, तरी काही मोठ्या वित्तीय संस्थांचा विश्वास याच्या उलट आहे.
बँक ऑफ अमेरिका (BofA) चा अंदाज आहे की सोन्याची किंमत पुढील दोन वर्षांत प्रति औंस 3,500 डॉलरपर्यंत जाऊ शकते, तर गोल्डमन सॅक्सने 2025 अखेर ही किंमत *3,300 डॉलर्सपर्यंत पोहोचेल, असा दावा केला आहे.

गुंतवणूकदारांवर परिणाम, खरेदीदारांना दिलासा

सोन्याच्या किंमती घसरल्यास दागिने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी सध्याच्या उंच दरावर गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागू शकतो. त्यामुळे सोने खरेदी करताना काळजीपूर्वक विचार करून पावले उचलण्याचा सल्ला अर्थतज्ज्ञ देत आहेत.

एकीकडे महागाई आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे सोने उंचावर गेले असले, तरी वाढलेला पुरवठा, मागणीतील घट आणि बाजार संपृक्ततेमुळे यामध्ये लवकरच मोठी घसरण होऊ शकते, असा अंदाज काही जागतिक तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी ही संधी ठरू शकते, पण गुंतवणूकदारांसाठी धोका वाढू शकतो.

आर्थिक आंतरराष्ट्रीय राजकारण

Join WhatsApp

Join Now