BIS Care app: सोने व चांदीच्या दरात किती घट व वाढ झाली याकडे सर्वांचे लक्ष असते. विशेष म्हणजे स्त्रियांचे अधिकच लक्ष असते. स्त्रियांना दागिने अधिकच प्रिय असतात. २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,००० प्रति १० ग्रॅम आहे. सोन्याची किंमत काल होती तिच आजही आहे त्यात कोणताही बदल झालेला नाही. चांदीचे दर २० पैशांनी घसरले आहेत. ५१,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊ शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्सच्या माहितीसाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
२४ कॅरेट म्हणजे सर्वात शुद्ध सोने मानले जाते. पण ते ओळखायचं कसं की, हे सोने किती कॅरेटचे आहे. ते ओळखण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. त्या अॅपचे नाव ‘BIS Care app’ आहे. या अॅपमुळे फक्त शुद्धताच तपासल्या जात नाही तर त्याबाबाबतीत असलेल्या तक्रारी सुद्धा त्यावर करू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.
या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तात्काळ मिळणार आहे. २४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते. २२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते. २१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते. १८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते. १४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.
प्रोडक्शन, स्टेट टॅक्स आणि जडणघडणीसाठी आकारल्या जाणाऱ्या किमतीमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,००० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५१,२७० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,३०० रुपये असेल.
नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५१,३०० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,०३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,३०० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५१५ रुपये आहे. वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहूनच ग्राहक खरेदी करतात. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
महत्वाच्या बातम्या
Durga Temple: इस्लामिक कट्टरपंथ्यांचा मंदिरात राडा, दुर्गापूजेसाठी तयार केलेल्या मुर्त्या फोडल्या अन्.., वाचून येईल संताप
Melghat: मी मुक्काम केलेलं घर रात्रभर गळत होतं, माझ्याकडून त्यांना दोन घरं, आजच भूमीपूजन – अब्दुल सत्तारांची घोषणा
उद्धव ठाकरेंची व्होट बँक राज ठाकरे फोडणार? BMC निवडणुकीत करणार मोठा गेम
Tata Motors : येत आहे टाटाची नवीन Blackbird SUV, क्रेटा आणि नेक्सॉनचेही उडवणार होश