ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज अष्टपैलू क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) सध्या त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. शुक्रवार, 25 मार्च 2022 रोजी त्याची गर्लफ्रेंड विनी रमणसोबत (Winnie raman) त्याने लग्न केले. विनी मूळची भारतीय आहे. ग्लेन मॅक्सवेल इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून खेळला होता.(Glenn Maxwell marries girl of Indian)
गेल्या पाच वर्षांपासून तो विनीला डेट करत होता. दोघांनी आधी ख्रिश्चन धर्मानुसार लग्न केले, नंतर आता पारंपारिक तमिळ रितीरिवाजानुसार लग्न केले आहे. विनी रमण या मूळ भारतीय आहेत. ती तामिळ हिंदू कुटुंबातील आहे. विनी रमन ही मूळची भारतीय आहेत, पण तिचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे झाला आहे.
विनी रमनने वैद्यकीय शास्त्राचे शिक्षण पूर्ण केले आणि ती फार्मासिस्ट झाली. विनी रमन हिने व्हिक्टोरिया येथील मेंटन गर्ल्स सेकंडरी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. विनी रमन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिने ग्लेन मॅक्सवेलसोबतचे अनेक फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत. ग्लेन मॅक्सवेल आणि विनी रमन यांची मार्च 2020 मध्ये एंगेजमेंट झाली. कोरोनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले होते आणि आता दोघांचे लग्न झाले आहे.
विनी रमनचे तिच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे आणि ती अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिच्या भाचीसोबतचे गोंडस फोटो शेअर करत असते. विनी रमनने आपल्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले होते की, मॅक्सवेल आणि तिची 2013 मध्ये मेलबर्नमधील एका कार्यक्रमात भेट झाली होती. मॅक्सवेलने आधी तिच्याशी संभाषण सुरू केल्याचे विनीने सांगितले होते.
काही वर्षे डेटिंग केल्यानंतर दोघांनीही आपले नाते अधिकृत केले. ती अनेक प्रसंगी मॅक्सवेलसोबत दिसली. तमिळमध्ये छापलेली मॅक्सवेल आणि विनीच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. विनीला पोहणे, प्रवास आणि क्रिकेटची प्रचंड आवड आहे.
विनीने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने लिहिले आहे की लग्न हे दोन जीव आणि त्यांच्या कुटुंबाचे बंधन आहे. आम्हाला आमच्या पालकांचे खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला. त्याच्याशिवाय आम्ही इथपर्यंत पोहचलो नसतो. आयपीएलच्या या सीझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्याला 11 कोटी खर्चून मॅक्सवेलला रिटेन केले होते.
महत्वाच्या बातम्या-
यशवंत जाधवांनी आईवरच फाडलं बिल? मातोश्री ला दोन कोटींचे गिफ्ट देण्याबाबत डायरीतून झाला मोठा खुलासा
योगींचा विजय हा लोकशाहीचा विजय नाही; निवडणूक आयुक्तांचं खळबळजनक विधान
पंतप्रधानांना दिग्दर्शकाच्या पायाशी लोळणं घ्यावं लागत असेल तर द काश्मीर फाइल्सवरून शरद पवारांचा खोचक टोला
आता हिंदू देखील अल्पसंख्याक होणार; मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली ‘ही’ माहिती